Baramati News : 10 वी च्या विद्यार्थांसाठी सुवर्णसंधी; रविवारी लडकत स्कॉलरशिप परीक्षेचे आयोजन

बारामती : दरवर्षी प्रमाणे याही वर्षी लडकत सायन्स अकॅडमी अर्थातच लडकत स्कूल ऑफ फाउंडेशन अँड ज्युनिअर कॉलेज बारामती यांनी इयत्ता 10 वी मध्ये शिकत असणाऱ्या मुलांसाठी तसेच इयत्ता12 वी प्रवेशासाठी लडकत स्कॉलरशिप परीक्षा 25 आयोजित केली आहे. त्यामधून विद्यार्थांना 2 लाख रुपयांची स्कॉलरशिप जिंकण्याची संधी मिळणार आहे.
५ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता लडकत स्कूल ऑफ फाउंडेशन अँड ज्युनिअर कॉलेज बारामती येथे ही परीक्षा होणार आहे. लडकत स्कूल ऑफ फाउंडेशनमध्ये ,प्री प्रायमरी ते १२ वी सायन्स पर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. इयत्ता ५ वी पासूनच विद्यार्थ्यांची मेडिकल आणि इंजिनीअरिंग संबंधित स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली जाते.
यासाठी तज्ञ आणि अनुभवी प्राध्यापक वर्ग, अत्याधुनिक शिक्षण प्रणाली, कॉम्पुटर लॅब, सायन्स लॅबोरेटरी, प्रशस्त मैदान आणि निसर्गरम्य वातावरण उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांचां सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय आहे. जास्तीत जास्त विद्यार्थांनी या स्कॉलरशिप परीक्षेचा लाभ घ्यावा असे आवाहन प्राचार्य रामचंद्र वाघ यांनी विद्यार्थी तसेच सर्व पालकांना केले आहे.
प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी भरघोस बक्षिसे बक्षिसे:
प्रथम क्रमांक – शैक्षणिक टॅब ,द्वितीय क्रमांक – स्मार्ट वॉच प्रो
तृतीय क्रमांक – स्मार्ट वॉच
उत्तेजनार्थ बक्षीस: पहिल्या 10 विद्यार्थ्यांना स्कूल बॅग तर सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
नाव नोंदणीसाठी:या फोन नंबर 9545952547 व्हॉट्सॲप करा तुमचे नाव, शाळेचे नाव आणि इयत्ता.अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा: 7741017266 / 9545952547 या नंबरवर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.





