Golden Globe 2026: रेड कार्पेटवर प्रियंका चोप्राचा जलवा, निक जोनससोबतची केमिस्ट्री ठरली चर्चेचा विषय

Golden Globe 2026 : ग्लोबल आयकॉन प्रियंका चोप्रा जोनस पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी कारण ठरलं आहे हॉलीवूडमधील प्रतिष्ठित पुरस्कार सोहळा गोल्डन ग्लोब अवॉर्ड्स 2026. आपल्या ग्लॅमरस लूकसोबतच पती निक जोनससोबतच्या रोमँटिक ट्यूनिंगमुळे प्रियंकाने रेड कार्पेटवर सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
लॉस एंजेलिसमध्ये 83वा गोल्डन ग्लोब
11 जानेवारी 2026 रोजी लॉस एंजेलिसमध्ये 83व्या गोल्डन ग्लोब अवॉर्ड्सचे आयोजन करण्यात आले होते. यंदा खास बाब म्हणजे प्रियंका चोप्रा या सोहळ्यात प्रेझेंटर म्हणून सहभागी झाली होती.
डार्क ब्लू ड्रेसमध्ये प्रियंकाचा ग्लॅमरस अंदाज
रेड कार्पेटवर पाऊल टाकताच प्रियंकाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. तिने डार्क ब्लू रंगा स्टायलिश ड्रेस परिधान केला होता. मिनिमल अॅक्सेसरीज आणि एलिगंट मेकअपमुळे तिचा लूक अधिकच खुलून दिसत होता.
Nick Jonas and Priyanka Chopra look incredible at the #GoldenGlobes 🤩 pic.twitter.com/nFTdnLhlvD
— Chicks in the Office (@ChicksInTheOff) January 11, 2026
निक जोनससोबत परफेक्ट केमिस्ट्री
या खास प्रसंगी प्रियंका पती निक जोनससोबत दिसली. निक ब्लॅक टक्सीडोमध्ये अतिशय देखणा दिसत होता. दोघांनीही कॅमेऱ्यासमोर दिलखुलास पोज दिले. रेड कार्पेटवरचा एक खास क्षण सगळ्यांचे लक्ष वेधून गेला, जेव्हा निकने प्रेमळपणे प्रियंकाचे केस नीट केले. या गोड क्षणाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाले.
भारतात सकाळी थेट प्रसारण
11 जानेवारीला पार पडलेला हा पुरस्कार सोहळा भारतीय वेळेनुसार 12 जानेवारी रोजी सकाळी 6.30 वाजता टीव्हीवर प्रसारित करण्यात आला. या कार्यक्रमात अनेक आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींची उपस्थिती पाहायला मिळाली.
एकूणच, गोल्डन ग्लोब 2026 मध्ये प्रियंका चोप्राने आपल्या स्टाईल, आत्मविश्वास आणि निक जोनससोबतच्या केमिस्ट्रीमुळे पुन्हा एकदा चाहत्यांची मने जिंकली.





