‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्राने बाजी मारलीच; दोन वेळा पराभूत केलेल्या जर्मनीच्या ज्युलियन वेबरला टाकलं मागे

Neeraj Chopra Wins Paris Diamond League 2025 | भारताचा ‘गोल्डन बॉय’ भालाफेकपटू नीरज चोप्राने पॅरिस डायमंड लीग स्पर्धा जिंकली आहे. नीरज चोप्रासमोर जर्मनीच्या ज्युलियन वेबर याचे आव्हान होते. यावेळी मात्र नीरज त्याच्यावर भारी पडला.
जर्मनीच्या वेबरला पहिल्या प्रयत्नातील ८७.८८ मीटर लांब अंतरावरील फेकीसह दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. फ्रान्स येथील स्टेड सेबास्तियन चार्लेटी येथे पार पडलेल्या पुरुष गटातील भालाफेक स्पर्धेतील फायनलमध्ये नीरज चोप्राने पहिल्या प्रयत्नात ८८.१६ मीटर सर्वोत्तम फेकीसह ही मोहीम काबीज केली.
पहिल्या प्रयत्नात ८८.१६ मीटर फेकीसह जबरदस्त सुरुवात करणाऱ्या नीरज चोप्राने दुसऱ्या प्रयत्नात ८५.१० मीटर अंतर भाला फेकला. तिसरा, चौथा आणि पाचवा प्रयत्न फाउल ठरल्यावर सहाव्या प्रयत्नात नीरज चोप्रानं ८२.८९ मीटर लांब भाला फेकल्याचे पाहायला मिळाले. मात्र त्याला यावेळी ९० पारचा डावही साधता आला नाही. पण पहिल्या प्रयत्नातील फेकी सगळ्या स्पर्धकांमध्ये भारी ठरली आणि त्याला अव्वल स्थान पटकावता आले. Neeraj Chopra Wins Paris Diamond League 2025 |
8 वर्षानंतर सहभागी
नीरज चोप्रा पॅरिस डायमंड लीग स्पर्धेत 8 वर्षानंतर सहभागी झाला होता. २०१७ मध्ये नीरज चोप्राला ८४.६७ मीटर थ्रोसह पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. पॅरिसमधील स्पर्धेआधी दोहा डायमंड लीग स्पर्धेत नीरज चोप्रानं ९०.२३ मीटरसह आतापर्यंतच्या सर्वात बेस्ट थ्रोची नोंद केली होती. पण यावेळी जर्मनीच्या ज्युलियन वेबरनं शेवटच्या प्रयत्नात ९१.०६ मीटर अंतरावर भाला फेकत नीरजला मागे टाकले होते.
तर मे २०२५ मध्ये पोलंड येथील स्पर्धेतही वेबरनं ८६.१४ मीटर थ्रोसह नीरजला मागे टाकत स्पर्धा गाजवली होती. या स्पर्धेत नीरज चोप्रा ८४.१४ मीटरसह मागे राहिला. पण यावेळी मात्र नीरज त्याच्यावर भारी पडला. ८८.१६ मीटर लांब भाला फेकत जर्मनीच्या खेळाडूला नीरजने तगडी टक्कर दिली आहे. Neeraj Chopra Wins Paris Diamond League 2025 |
हेही वाचा:





