सीमाशुल्क विभागाकडून 31 लाखांचे सोने जप्त
Updated On:

पुणे – पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा शुल्क विभागाने एका प्रवाशाकडून 31 लाख 13 हजार 446 रुपयांचे सोने जप्त केले आहे. शेहजाद बाबामियॉ मोमिन असे प्रवाशाचे नाव आहे. त्याने एका पॉलिथिनच्या पिशवीमध्ये पेस्ट स्वरुपात हे सोने आणले होते. या सोन्याचे वजन 957.10 ग्रॅम इतके होते. तो एअर इंडियाच्या विमानाने सोमवारी पुण्यात उतरला होता. सोन्याची तस्कीरी केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला ताब्यात घेऊन पुढील चौकशी करण्यात येत आहे.





