Entertainment News ।अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट नुकतेच १२ जुलैला लग्नबंधनात अडकले. या जोडप्याचं लग्न गेल्या कित्येक महिन्यापासून चर्चेत आहे. या लग्नात बॉलिवूडपासून ते देश-विदेशातील बडे उद्योगपती आणि राजकारणी या पार्टीत सामील झाले होते.या दरम्यानचे सोशल मीडियावर सातत्याने फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहे, अशात वर अनंताचा एक फोटो तुफान व्हायरल झाला आहे.
व्हायरल झालेल्या या फोटोत त्याने लग्नात ऑरेंज कलरच्या शेरवानीसोबत स्नीकर्स परिधान केले होते. यात त्याचा सिंपल लूक पाहायला मिळाला आहे. अशात त्याने घातलेल्या स्नीकर्सची चांगलीच चर्चा होत आहे.
दरम्यान अनंत अंबानी जेव्हा कुटुंबासोबत लग्नाच्या ठिकाणी पोहोचले. त्यावेळी सर्वानी त्याचे फोटो क्लिक केले.फोटो क्लिक करतांना त्यांच्या सोबत कुटुंबही दिसून आले. यावेळी फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून अनंत लग्नात त्याच्या ड्रेसमुळे चर्चेत होता. त्याचा लूक खूपच साधा होता. तो गोल्डन ऑरेंज कलरच्या शेरवानीमध्ये दिसला. त्याने शेरवानी आणि स्नीकर्ससह आपला लूक पूर्ण केला. या काळात त्याचे बूट खूप चर्चेत राहिले.
अनंतचे हे स्नीकर्स खास त्याच्यासाठी पॅरिसहून मागवण्यात आले. स्नीकर्स सध्या ट्रेंडमध्ये आहेत. अनेक सेलिब्रिटींना ते त्यांच्या लग्नसोहळ्यात आणि रिसेप्शनमध्ये घालायला आवडतात. आता अनंता अंबानींनी तोच ट्रेंड फॉलो केला आहे. त्याच्या शूजबद्दल असे सांगितले जात आहे की हे पॅरिसच्या प्रसिद्ध शू ब्रँड बर्लुटीचे होते. बर्लुटीच्या अधिकृत वेबसाइटवर या फुटवेअरला फास्ट ट्रॅक स्क्रिटो लेदर स्नीकर असे नाव देण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ते बनवण्यासाठी व्हेनेझिया लेदरचा वापर करण्यात आला आहे. त्याच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, वेबसाइटवर कस्टमायझेशनपूर्वी या शूजची किंमत सुमारे 1.67 लाख रुपये आहे. अनंतच्या लूकसाठी खास स्नीकर्स तयार करण्यात आले. त्यात सोन्याचे सामानही बसवण्यात आले आहे. त्यामुळे स्नीकर्सचा लूक आणखी वाढला आहे.