Gold-Silver Rates Today : सोने व चांदीच्या दरात घट
Updated On:

नवी दिल्ली – जागतिक संकेतानुसार भारतीय सराफात गुरुवारी सोन्याचा दर 195 रुपयांनी कमी होऊन 50,723 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. तयार चांदीचा दर 863 रुपयांनी कमी होऊन 52,819 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला.
जागतिक बाजारात सोन्याचा दर कमी होऊन 1,703 डॉलर व चांदीचा दर 17.73 डॉलर प्रति औंस या पातळीवर गेला होता. एचडीएफसी सिक्युरिटीज या संस्थेचे विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले की, डॉलर मजबूत होत असल्यामुळे सोन्याच्या दरात घट झाली. लवकरच अमेरिकेचे पतधोरण जाहीर होणार आहे, तोपर्यंत सोने आणि चांदीचे दर अस्थिर राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.




