नवी दिल्ली – जागतिक संकेतानुसार मंगळवारी भारतीय सराफात सोन्याचा दर केवळ सहा रुपयांनी वाढून 50,290 रुपये प्रत्येक दहा ग्रॅम झाला. तयार चांदीचा दर मात्र 137 रुपयांनी कमी होऊन 55,539 रुपये प्रति किलो झाला. जागतिक बाजारात सोन्याचा दर वाढून 1,711 डॉलर व चांदीचा दर 18.80 डॉलर प्रति औंस या पातळीवर गेला.
एचडीएफसी सिक्युरिटीज या संस्थेचे विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले की, वायदे बाजारात ज्या प्रमाणात सोन्याचे दर वाढले त्या प्रमाणात स्पॉट मार्केटमध्ये सोन्याचे दर वाढले असल्याचे दिसून आले. जागतिक गुंतवणूकदारांचे फेडरल रिझर्व नेमकी किती व्याज दरवाढ करते यावर लक्ष आहे. त्यानंतर सोन्यासह विविध बाजारांना एक दिशा मिळेल असे ते म्हणाले.