अर्थसंकल्पाच्या दुसऱ्या दिवशी सोने-चांदीच्या दरात घसरण; तब्बल ‘इतक्या’ रुपयांनी स्वस्त झालं सोनं

Gold-Silver Rate| अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी काल मंगळवारी 23 जुलै रोजी अर्थसंकल्प सादर केला. यानंतर आज दुसऱ्या दिवशी सोने-चांदी किंमती कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे. आयात शुल्कातील कपातीमुळे 10 ग्रॅम सोन्याचा भाव 2,300 रुपयांनी कमी झाले आहे. त्यामळे सोने खरेदी करणाऱ्यांसाठी ही दिलासादायक माहिती आहे.
गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 65,100 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 71,010 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. राजधानी दिल्लीत 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 71,010 रुपये आहे. 24 कॅरेट सोन्याचा भाव मुंबई आणि कोलकाता 70,850 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चेन्नईमध्ये 71,450 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
दिल्लीतील सोन्याचे दर
दिल्लीत 22 कॅरेट सोन्याचा भाव अंदाजे 65,090 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 71,010 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
मुंबईतील सोन्याचे दर
मुंबईत सध्या 22 कॅरेट सोन्याचा भाव 64,940 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे,
तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 70,850 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चांदीचे दर
23 जुलै रोजी बजेटमध्ये सीमा शुल्कात कपातीचा निर्णय घेतल्यामंत्र चांदी 3,500 रुपयांनी घसरली. आज गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 88,000 रुपये आहे.
दरम्यान, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात सोने-चांदीवरील सीमाशुल्कात कपात करण्याची घोषणा केली. यानंतर काही वेळातच सोन्या-चांदीच्या भावात मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे सध्या सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांना ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
हेही वाचा:
अर्थसंकल्पानंतर सेन्सेक्स 80280 पर्यंत तर निफ्टी 24450 च्या खाली ; TATA च्या शेअर्सची उसळी





