Gold-Silver Rates: युद्धामुळे गेल्या आठवड्यात सोन्याचे दर बर्याच प्रमाणात वाढले आहेत. अशा परिस्थितीत भारतातील व्यापार्यांनी विक्री करून नफा काढून घेतल्यामुळे सोन्याबरोबरच चांदीचे दर शुक्रवारी कमी झाले मात्र जागतिक बाजारात या दोन धातूचे दर वाढले होते. दिल्ली सराफात सोन्याचा दर 1,100 रुपयांनी कमी होऊन 1 लाख 64 हजार 100 रुपये प्रति दहा ग्रॅम या पातळीवर गेला. चांदीचा दरही शुक्रवारी 600 रुपयांनी कमी होऊन 2 लाख 71 हजार 700 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला. जागतिक बाजारात सोन्याचा दर 14 डॉलरने म्हणजे 0.19 टक्क्यांनी वाढून 5,095 डॉलर आणि चांदीचा दर 1.4 टक्क्यांनी वाढून 83.40 डॉलर प्रति या पातळीवर गेला. भारतीय गुंतवणूकदारांना सोन्याने चांदीचे दर आणखी जास्त वाढणार नाहीत असे वाटत आहे. त्यामुळे सध्याच्या उच्च पातळीवर विक्री करून या गुंतवणूकदारांनी नफा काढून घेतला आहे. मात्र आखातातील युद्ध संपण्याची कसलीही लक्षणे दिसून येत नाहीत. त्यामुळे लघु ते मध्यम पल्ल्यात सोने आणि चांदीचे दर जास्त पातळीवर राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.