Gold-Silver Rate : चांदीचा दर घसरून तीन महिन्याच्या निचांकावर…
Updated On:

नवी दिल्ली :– रशिया-युक्रेन युद्ध आणि चलन बाजारातील अस्थिरतेमुळे सोने-चांदीसह सर्वच क्षेत्रात कमालीची अस्थिरता निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत गेल्या आठवड्यापासून चांदीचा दर घसरून आता तीन महिन्याच्या निचांकावर गेला आहे.
सोन्याचा दर शंभर रुपयांनी कमी होऊन 78,700 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. तर तयार चांदीचा दर 4,900 रुपयांनी कोसळून 90,900 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला.
Reserve Bank of India : भारतातील बँका आणि वित्तीय संस्थांचा आकार वाढण्याची गरज – एम राजेश्वर राव
जागतिक बाजारातही या दोन धातूचे दर कमी झाले आहेत. अमेरिकेत व्याजदर वाढ होण्याच्या शक्यतेमुळे सोने आणि चांदीचे आकर्षण गुंतवणूकदारांच्या दृष्टिकोनातून कमी झाले आहे.





