उच्चांकी दरवाढीनंतर सोन्याचे भाव कोसळले; जाणून घ्या आजचे ‘दर’

Gold-Silver Price Today । मागील काही दिवसांपासून वाढत असलेल्या सोने-चांदीच्या किंमतीने ग्राहकांना काहीसा दिलासा दिला आहे. आज २ मे 2024 रोजी भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदी स्वस्त झाले आहेत जाणून घ्या आजचा बाजार भाव …
सोन्याची किंमत
१० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ७०,९०० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ७१,७९० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाली होती
चांदीची किंमत
चांदी ८१,२६० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ८२,४५० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.
मुंबई
२२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ६४,८७३ रुपये आहे.
२४ कॅरेट सोन्याची किंमत ७०,७७० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे
१० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६४,८७३ असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ७०,७७० रुपये असेल.
नागपूर
प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६४,८७३ तर २४ कॅरेट सोन्याचा दर ७०,७७० रुपये इतका असेल.
नाशिक
२२ कॅरेट सोन्याचा दर ६४,८७३ आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ७०,७७० रुपये आहे.
हे वाचले का ? महाराष्ट्रात ‘ही’ निवडणूक ‘भाजपासाठी अवघड?’ देवेंद्र फडणवीस म्हणाले,’आव्हान तर…’





