Gold Silver Price Today: सोनं झालं स्वस्त! जाणून घ्या नवे दर

Gold Silver Price Today । सोने- चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार होताना पाहायला मिळत आहे. परंतु आज ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी आहे. आज सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. सध्या प्रति १० ग्रॅम सोन्याची किंमत ७२,८२० इतकी झाली आहे. १० ग्रॅम सोन्याच्या दरात ४३० रुपयांची घट झाली आहे.
मात्र एकीकडे सोने स्वस्त झाले असले तरी चांदीच्या दरात वाढ झाली आहे. चांदी ८५,३६० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. त्यामुळे जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, आजचे सोन्याचे किंमती जाणून घ्या.
जाणून घ्या तुमच्या शहरातील सोन्याचे दर
मुंबई
२२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ६६,७५० रुपये आहे.
२४ कॅरेट सोन्याची किंमत ७२,८२० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे
प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६६,७५० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ७२,८२० रुपये असेल.
नागपूर
प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६६,७५० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ७२,८२० रुपये इतका असेल.
नाशिक
२२ कॅरेट सोन्याचा दर ६६,७५० आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ७२,८२० रुपये आहे.
हेही वाचा:
शेअर बाजार वधारला ; निफ्टी 22,150 च्या वर, सेन्सेक्स 73 हजारांच्या पातळीवर





