Gold -Silver Price Crash : सोन्याच्या दरात मोठी पडझड; सोनं तब्बल 11 हजारांनी स्वस्त, खरेदीसाठी गुंतवणूकदारांकडे सुवर्णसंधी
Gold -Silver Price Crash :

Gold -Silver Price Crash : सोन्या-चांदीच्या गगनाला भिडलेल्या दरांना अचानक ब्रेक लागला असून गेल्या आठवडाभरात मोठी घसरण नोंदवली गेली आहे. जागतिक बाजारातील विक्रीमुळे मौल्यवान धातूंमध्ये ही घसरण झाली असून इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) आणि MCX च्या आकडेवारीतून हे स्पष्ट झाले आहे.
आठवडाभरात मोठी घसरण
24 कॅरेट सोन्याचा दर मागील आठवड्यात 1,58,399 रुपयांवर होता, तो आता घसरून 1,47,218 रुपयांवर आला आहे. म्हणजेच सोनं तब्बल 11,100 रुपयांनी स्वस्त झालं आहे.
त्याचप्रमाणे चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली असून, प्रति किलो दर 2,60,488 रुपयांवरून 2,32,362 रुपयांपर्यंत खाली आला आहे. म्हणजेच चांदी तब्बल 28,100 रुपयांनी स्वस्त झाली आहे.
जागतिक बाजाराचा परिणाम
जागतिक कमॉडिटी मार्केटमध्ये, विशेषतः COMEX वर झालेल्या विक्रीमुळे सोनं 2.47 टक्क्याने घसरून 4,492 डॉलर प्रति औंसवर आले आहे. चांदीतही 4.78 टक्के घसरण होऊन ती 67.81 डॉलर प्रति औंसवर ट्रेड होत आहे. दरम्यान, कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होऊन ते 98.09 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले आहे.
स्थानिक बाजारातील दर
सध्याच्या घडीला सराफा बाजारात अंदाजे दर पुढीलप्रमाणे आहेत:
24 कॅरेट सोने: 1,45,970 रुपये (प्रति 10 ग्रॅम)
22 कॅरेट सोने: 1,33,800 रुपये (प्रति 10 ग्रॅम)
18 कॅरेट सोने: 1,09,480 रुपये (प्रति 10 ग्रॅम)
चांदी (999): 2,32,364 रुपये (प्रति किलो)
दर का घसरले?
तज्ज्ञांच्या मते, सोन्याचे दर उच्चांकावर पोहोचल्यानंतर गुंतवणूकदारांनी नफा वसुली सुरू केली आहे. तसेच डॉलरमधील चढ-उतार आणि जागतिक आर्थिक धोरणांचा दबावही या घसरणीमागे कारणीभूत आहे. तथापि, कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतीमुळे भविष्यात महागाई वाढण्याची शक्यता असल्याने सोन्या-चांदीचे दर पुन्हा वाढू शकतात, असेही तज्ज्ञांचे मत आहे.





