Gold Rates : सोन्याचे दर कोसळले; जाणून घ्या आजचा 10gmचा दर
Updated On:

नवी दिल्ली – जागतिक बाजारात सोन्याचे दर कमी झाले. त्याचबरोबर रुपयाचा भाव सकाळच्या सत्रात वधारल्यामुळे भारतीय बाजारात गुरुवारी सोन्याचे दर मोठ्या प्रमाणात कमी झाले.
दिल्ली सराफात सोन्याचा दर 491 रुपयांनी कमी होऊन 45,735 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. तयार चांदीचा दर 724 रुपयांनी कोसळून 61,541 रुपये प्रति किलो झाला.
याबाबत एचडीएफसी सिक्युरिटीज या संस्थेचे विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले की, सोन्याचा भाव वाढल्यानंतर आयात स्वस्त होते. त्याचबरोबर अमेरिकेच्या कर्जराख्यावरील परतावा वाढत असल्यामुळे सोन्यातील गुंतवणूक तिकडे वळत आहे. त्यामुळे सोन्याच्या दरात घट झाली.





