Gold Rate : सोन्याच्या दरात सुधारणा…! जाणून घ्या, आजचा 10 ग्रॅमचा दर…

Gold Rate in Delhi – अखिल भारतीय सराफा संघटनेने दिलेल्या माहितीनुसार दिल्ली सराफात सोमवारी सोन्याचा दर 150 रुपयांनी वाढून 79,350 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. तयार चांदीचा दर 91,700 रुपये प्रति किलो या पातळीवर स्थिर राहिला.
सोने आणि चांदीचे दर उच्च पातळीवर राहण्यासाठी सध्याचे वातावरण पूरक आहे. सध्या विविध देशात सुट्याचा हंगाम आहे. त्यामुळे सोने व चांदी बाजारातील घडामोडी कमी आहेत. डॉलर उच्च पातळीवर असल्यामुळे सोन्याची खरेदी जास्त प्रमाणात होताना दिसत नाही.
IND vs AUS ECTA | भारत-ऑस्ट्रेलिया मुक्त व्यापार करार यशस्वी – केंद्रीय उद्योग मंत्री गोयल
अशा अवस्थेत जागतिक बाजारात सोन्याचा दर 5.70 डॉलरने कमी होऊन 2,626 डॉलर व चांदीचा दर एक टक्क्याने कमी होऊन 29.96 डॉलर प्रति औंस झाला. सोने व चांदीच्या किमती सध्याच्या पातळीवर काही प्रमाणात स्थिर राहण्याची शक्यता काही विश्लेषकांनी व्यक्त केली.





