Gold Price Today : सोन्याच्या दरात सलग तिसऱ्या दिवशी घसरण; चांदी स्थिर, पाहा ताजे भाव
Gold Price Today : दिल्लीत सोन्याचा दर १० ग्रॅममागे २,२०० रुपयांनी घसरून १ लाख ४३ हजार ४०० रुपयांवर आला. चांदीचा भाव १ लाख ८७ हजार ५०० रुपयांवर स्थिर.

Gold Price Today : दिल्लीत सोन्याच्या दरातील घसरण गुरुवारीही कायम राहिली आहे. सलग तिसऱ्या दिवशी सोन्याचे दर कमी झाले असून, आज १० ग्रॅममागे २,२०० रुपयांची घट झाली आहे. त्यामुळे दिल्लीत ९९.९ टक्के शुद्धतेच्या सोन्याचा दर १ लाख ४३ हजार ४०० रुपयांवर आला आहे. बुधवारी हाच दर १ लाख ४५ हजार ६०० रुपये होता.
दुसरीकडे, चांदीच्या दरात कोणताही बदल झाला नाही. चांदीचा भाव १ किलोमागे १ लाख ८७ हजार ५०० रुपयांवर स्थिर राहिला.
व्यापाऱ्यांच्या मते, बाजारातील खरेदीचा कमी उत्साह आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर घसरल्यामुळे देशांतर्गत बाजारातही सोन्यावर दबाव आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर प्रति औंस ३,९५० डॉलरच्या खाली आला. अमेरिकी डॉलर मजबूत झाल्यामुळे सोन्याच्या किमतीत सुमारे १ टक्क्यांची घसरण झाली. दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचा भावही १.१७ टक्क्यांनी घसरून ५१.०६ डॉलर प्रति औंस झाला.
एचडीएफसी सिक्युरिटीजचे कमोडिटी विश्लेषक सौमिल गांधी यांनी ही माहिती दिली. मिराए अॅसेट शेअरखानचे कमोडिटी प्रमुख प्रवीण सिंह यांच्या मते, डॉलर निर्देशांकाने १०३ ची पातळी ओलांडल्यास तो १०४.५० पर्यंत जाऊ शकतो. त्यामुळे सोन्या-चांदीच्या दरांवर आणखी दबाव येण्याची शक्यता आहे. गुरुवारी डॉलर निर्देशांक १०२.८८ वर व्यवहार करत होता.


