गुढीपाडव्याच्या आधी सोनं-चांदीला चकाकी; जाणून घ्या नवे दर…

Gold Rate Today | साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला गुढीपाडवा हा सण शुभ मानला जातो. गुढीपाडव्याच्या दिवशी अनेकजण नव्या वस्तू खरेदी करण्याला प्राधान्य देतात. गेल्या काही काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होताना दिसतात. यातच आता गुढीपाडव्याच्या एक दिवस आधी शनिवारी 29 मार्च 2025 रोजी सोन्याच्या दरात वाढ झाली की घट हे पाहुयात.
तर आज देशात सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. 24 कॅरेट सोन्याचे दर 90,000 रुपये प्रतितोळा आहे. तर, 22 कॅरेट सोन्याचा दर 82 हजार रुपये प्रतितोळा असणार आहे. सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही आज वाढ झाल्याचे पाहायला मिळतंय. भारतात एक किलो चांदीचे दर 1,05,000 रुपये प्रति किलोग्रॅम आहे. Gold Rate Today |
काही दिवसांपूर्वी सोन्याच्या दरात घसरण झाली होती. त्यामुळं ग्राहकांना दिलासा मिळाला होता. मात्र आज पुन्हा एकदा सोन्याचे दरांनी उसळी घेतली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत मौल्यवान धातुच्या किंमती एक लाखांपर्यंत जाणार असल्याची देखील शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र ऐन गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येलाच सोन्याच्या दरात वाढ झाल्याने ग्राहकांना काहीसा हिरमोड झाल्याचे दिसत आहे.
सोन्याच्या किंमती वाढण्यामागची कारण कोणती?
सोन्याच्या किंमती वाढण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे जगभरातील आर्थिक अनिश्चितता आणि राजकीय तणाव आहे. जेव्हा परिस्थिती अस्थिर असते तेव्हा लोक सुरक्षित गुंतवणूकीच्या रूपात सोन्याकडे वळतात. अमेरिकेतील नवीन आर्थिक धोरणे, डॉलरच्या चढउतार आणि महागाईमुळे सोन्याची मागणीही वाढत आहे. तसेच बर्याच देशांच्या मध्यवर्ती बँकाही मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी करीत आहेत, ज्यामुळे त्याची किंमत सतत वाढत आहे. या सर्व कारणांमुळे सोनं त्याच्या विक्रमी पातळीजवळ पोहोचला आहे.
हेही वाचा:
Tukaram Omble : २६/११ मुंबई हल्ल्यातील शहीद तुकाराम ओंबळेंचे स्मारक उभारणार; शासन निर्णय जाहीर





