Pune Property: गोखले कंस्ट्रक्शन्सच्या नवरात्र गृहमहोत्सवात घरांवर 27% पर्यंत सवलत
Pune Property: गोखले कंस्ट्रक्शन्सचा नवरात्र गृहमहोत्सव ११ ते २० ऑक्टोबरदरम्यान. पुण्यातील विविध गृहप्रकल्पांवर ९, १८ आणि २७% पर्यंत सवलतीची संधी.

Pune Property: पुण्यातील प्रमुख भागांत निवासी आणि व्यापारी प्रकल्प उभारणाऱ्या गोखले कंस्ट्रक्शन्सतर्फे नवरात्रानिमित्त भव्य गृहमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे हे सलग १४ वे वर्ष आहे. यंदा घरखरेदीदारांना सदनिकांच्या किमतीवर ९, १८ आणि २७ टक्क्यांपर्यंत सवलत मिळणार असल्याने हा महोत्सव ग्राहकांसाठी विशेष ठरणार आहे.
गोखले कंस्ट्रक्शन्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विशाल गोखले यांनी सांगितले की, शहरातील विविध भागांत सुरू असलेल्या गृहप्रकल्पांमध्ये सदनिका खरेदी करणाऱ्या ग्राहकांना नवरात्राच्या काळात ही सवलत मिळणार आहे.
११ ते २० ऑक्टोबरदरम्यान हा गृहमहोत्सव आयोजित करण्यात आला आहे. मयूर कॉलनी, कर्वे नगर, सहकार नगर, प्रभात रोड, करिष्मा चौक-कोथरूड, डीपी रोड कोथरूड आणि सिटी प्राईडजवळील कोथरूड येथील प्रकल्पांची माहिती ग्राहकांना मिळणार आहे. या प्रकल्पांमध्ये २ बीएचकेपासून ६.५ बीएचके स्काय व्हिलापर्यंत विविध पर्याय उपलब्ध आहेत. सदनिकांच्या किमती अंदाजे १.६ कोटी रुपयांपासून पुढे आहेत.
गोखले कंस्ट्रक्शन्सकडून नजीकच्या काळात बाणेर, बावधन, औंध, हिंजवडी आणि बोट क्लब रोड येथेही नवीन प्रकल्प सुरू करण्यात येणार आहेत. या आगामी प्रकल्पांची माहितीही महोत्सवात ग्राहकांना मिळणार आहे.
याशिवाय सिटी प्राईड कोथरूडसमोरील गोखले बिझनेस बे या व्यापारी संकुलातील प्री-लीज आणि थेट विक्रीसाठी उपलब्ध कार्यालयांचे पर्यायही महोत्सवाचे आकर्षण असतील.
हा गृहमहोत्सव गोखले हाउस, आयकर कार्यालयाजवळ, प्रभात रोड, पुणे येथे होणार आहे. महोत्सवातील सर्व प्रकल्प रेरा नोंदणीकृत असल्याचे कंपनीने सांगितले आहे.





