Nagar | गोदावरी व गौतम केनला तोडणी कामगारांची प्रथम पसंती

कोपरगाव, (प्रतिनिधी)– ऊस तोडणी कामगारांच्या टोळ्या कमी असून त्यासाठी ट्रक्स धारकांनी स्वत:च्या ऊस तोडणी कामगार टोळ्या तयार करणे काळाची गरज आहे. ज्याप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रातील ट्रकधारक, ट्रॅक्टरधारक स्थानिक ऊस तोडणी कामगारांच्या टोळ्या तयार करून मोठ्या प्रमाणात व्यवसाय करतात.
त्याच धर्तीवर ट्रकधारकांनी ऊस तोडणी कामगारांच्या टोळ्या तयार करून जास्तीत व्यवसाय करावा. त्याकामी गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्ट कंपनी व गौतम केन ट्रान्सपोर्ट कंपनी तुम्हाला सर्वोतोपरी सहकार्य करील,
अशी ग्वाही देवून आपले सगळे व्यवहार चोख असल्यामुळे गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्ट कंपनी व गौतम केन ट्रान्सपोर्ट कंपनीला ऊस तोडणी कामगारांची प्रथम पसंती असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी सांगितले.
गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्ट कंपनी प्रा. लि; गौतमनगरची ५३ वी व गौतम केन ट्रान्सपोर्ट कंपनी प्रा. लिमिटेडची २५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच कंपनीचे मार्गदर्शक व चेअरमन आ. आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
याप्रसंगी ते बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराज, कर्मवीर शंकरराव काळे व सौ. सुशीलामाई काळे यांच्या प्रतिमेचे पूजन करून सभेस प्रारंभ झाला.
प्रास्तविक गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे कार्यकारी संचालक दौलतराव मोरे, सूत्रसंचलन व अहवाल वाचन जनरल मॅनेजर संतोष पवार यांनी केले. आभार संचालक विजयराव जाधव यांनी मानले. यावेळी सर्व विषय टाळ्यांच्या गजरात मंजूर करण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ नेते छबुराव आव्हाड, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष शंकरराव चव्हाण, संचालक डॉ. मच्छिन्द्र बर्डे, सुधाकर रोहोम, वसंतराव आभाळे,
सुनील मांजरे, श्रीराम राजेभोसले, मनोज जगझाप, अशोक मवाळ, अॅड. विद्यासागर शिंदे, गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्टचे कार्यकारी संचालक दौलतराव मोरे, गौतम केन ट्रान्सपोर्टचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर सुभाष गवळी,
गोदावरी खोरे संचालक दिलीपराव शिंदे, विजयराव जाधव, विक्रम मांढरे, प्रदीप कुऱ्हाडे, कैलास आहेर, अशोक निळकंठ, रमेश कोळपे, विजय थोरात, विक्रम सिनगर, गौतम केनचे संचालक भिकाजी सोनवणे, अरुण घुमरे,
बबनराव भारसाकळ, रामदास कोळपे, भाऊसाहेब जोरे, माणिकराव चंद्रे, गणेश आहेर, आप्पासाहेब निकम कारखान्याचे प्र.कार्यकारी संचालक सुनील कोल्हे, शेतकी अधिकारी निळकंठ शिंदे, आदींसह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रत्येक गावातून मताधिक्य वाढवा
राजकारणात आरोप-प्रत्यारोप चालूच असतात, तो राजकारणाचा एक भाग आहे. एका महिन्यात आपल्याला विधानसभा निवडणुकीला सामोरे जायचे आहे.
मतदारसंघातील प्रत्येक गावाला भरघोस निधी दिला आहे आणि विकासकामे देखील पूर्ण झाली आहेत तर काही कामे प्रगतीपथावर आहेत. त्यामुळे प्रत्येक गावातून जास्तीत-जास्त मताधिक्य वाढविण्यासाठी कामाला लागा, गाफील राहू नका. -आ.आशुतोष काळे





