देव तारी त्याला कोण मारी..? अपघातात बचावलेले रमेश विश्वास ‘या’ सीटवर होते, स्वतः सांगितला थरार.!

Ramesh Vishwas । Ahmedabad Air India Plane Crash – देव तारी त्याला कोण मारी…? ही म्हण खरी ठरली जेव्हा ४० वर्षीय भारतीय ब्रिटिश नागरिक विश्वास रमेश कुमार अहमदाबादमधील भीषण अपघातातून बचावले. गुरुवारी, अहमदाबादहून लंडनला जाणारी एअर इंडियाची फ्लाइट एआय171 उड्डाणानंतर अवघ्या ३५ सेकंदातच कोसळली.
एअर इंडियाने विमानातील सर्व लोकांच्या मृत्यूची पुष्टी केली. विमानात क्रू आणि प्रवाशांसह एकूण २४२ लोक होते आणि एअर इंडियाने सांगितले की २४१ लोकांचा मृत्यू झाला. विश्वास कुमार हा अपघातातून वाचलेला २४२ वा व्यक्ती होता.
विश्वासचे वाचणे हे चमत्कारापेक्षा कमी नाही. जेव्हा लोकांनी त्याला विमानाच्या ढिगाऱ्यातून बाहेर पडताना पाहिले तेव्हा सुरुवातीला कोणालाही विश्वास बसला नाही. विश्वासच्या शब्दात, उड्डाणानंतर काही सेकंदांनीच आम्हाला मोठा आवाज ऐकू आला.
सर्वजण घाबरले आणि आम्ही सर्वजण घाबरून ओरडू लागलो. लवकरच, माझ्याभोवती सर्वत्र मृतदेहाच दिसून आले. आजूबाजूला सर्वत्र ढिगारे होते. मी घाबरलो आणि पळत सुटलो आणि कोणीतरी मला शोधून रुग्णवाहिकेत टाकले.
विश्वासचा सीट नंबर कोणता?
विश्वास पुढे म्हणाला, माझ्या डोळ्यासमोर सर्व काही घडले पण मला स्वतःला माहित नाही की, मी कसा वाचलो. काही वेळ मला वाटले की, मीही मरणार आहे. पण जेव्हा मी डोळे उघडले तेव्हा मी जिवंत होतो. मी माझा सीट बेल्ट काढण्याचा प्रयत्न केला. यानंतर मी तिथून बाहेर पडलो. एअरहोस्टेस आणि इतर लोक माझ्या डोळ्यासमोर मरण पावले. टेकऑफनंतर ५-१० सेकंदात सर्व काही घडले.
विश्वासचा जीव कसा वाचला?
पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील शुक्रवारी विश्वासला भेटले. विश्वास म्हणाले की, टेकऑफच्या एका मिनिटातच ५ ते १० सेकंदांसाठी विमान गोठल्यासारखे वाटले. फ्लाइटचा हा भाग हॉस्टेलच्या तळमजल्यावर पडला होता. माझ्याशेजारी काही जागा होती आणि त्यामुळे मला बाहेर पडता आले. जेव्हा आग लागली तेव्हा माझा डावा हात भाजला होता आणि लोकांनी त्याला रुग्णवाहिकेतून आणले.
माझ्याकडे माझा बोर्डिंग पास होता आणि मी पूर्णपणे सुरक्षित राहिलो. गेल्या दोन दशकांपासून मी लंडनमध्ये राहत आहे. अलिकडेच मी माझा भाऊ अशोकसोबत भारतात आलो होतो. आम्ही गुजरात सीमेवर असलेल्या दीव या केंद्रशासित प्रदेशात गेले होते आणि परत येत होते. त्यावेळी हा अपघात घडला. असं तो म्हणाला.





