Ambadas Danve : ‘देवा’ जरा इकडे बघ! नुसती फुले वाहून ….; व्हिडीओ शेअर करत अंबादास दानवेंनी CM फडणवीसांवर साधला निशाणा

Ambadas Danve : राज्यात सध्या पावसाचा हाहाकार सुरू असून, पावसाचा सर्वाधिक फटाका विदर्भ आणि मराठावाड्यातील गावांना बसला आहे. पावसाने इतका कहर केला आहे की पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात शिरले आहे. बहुतांशी भागातील शेती आणि रस्ते पाण्याखाली गेले आहेत.
हवामान विभागाने पुढच्या २४ तासांत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पावसाच्या पाण्याने गावं पाण्याखाली गेली असून संबंधित ठिकाणच्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवले जात आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी एक्सवरून ट्वीट करत दोन व्हिडीओ शेअर केले आहेत.
‘देवा’ जरा इकडे बघ!
‘देवा’ने हे दिले.. ‘देवा’ ने ते दिले.. असा गजर सध्या गल्लीगल्लीतुन भाजपायी भक्तगण अगदी सूर्योदयापासून करताना दिसतात. कचराकुंडी लगतच्या भिंती ते बहुमजली इमारती अश्या सगळ्या ठिकाणी या ‘देवा’चे फोटो लागले आहेत. ज्या शिवरायांच्या पायावर यांचे देवाभाऊ फुले… pic.twitter.com/m8Gvq6AXRg
— Ambadas Danve (@iambadasdanve) September 15, 2025
नुसती फुले वाहून चालत नसतंय महोदय. विचार कृतीत उतरवावे लागतात. हे खालील दोन व्हिडियो बघून शिवराय आठवले तर त्यांच्या दुःखावर फुंकर घालता येते का बघा! नाही तरी तीन वर्षांपासून शेतकऱ्यांचा हाती फक्त पंचनामे.. पंचनामे आणि पंचनामेच येत आहेत! मदतीचा दमडा त्यांच्या खात्यात आलेला नाही! असं म्हणत दानवेंनी पावसामुळे शेतकऱ्यांचे झालेलं नुकसान यावर भाष्य केलं आहे.





