Asha Kale : देवा मला यासाठीच आतापर्यंत ठेवलंस का; ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे असं का म्हणाल्या? व्हिडिओ व्हायरल
Asha Kale : यावेळी बोलताना त्यांना भारावून गेले आणि त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

Asha Kale : मराठी चित्रपटसृष्टीतील आपल्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेत्री म्हणजे आशा काळे. मराठी चित्रपटसृष्टीतील त्यांचे योगदान अमूल्य आहे. त्यांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये लक्षवेधक भूमिका साकारल्या आहेत. आज जरी त्या वयोमानाच्या कारणास्तव चित्रपटात दिसत नसल्या तरी त्यांची चित्रपटसृष्टीसोबत जोडलेली नाळ आजही कायम आहे. नुकत्याच एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी बोलताना त्यांना भारावून गेले आणि त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
अभिनेता पुष्कर श्रोत्री आयोजित झिम्माडी या कार्यक्रमात त्या सहभागी झाल्या होत्या. या खास प्रसंगी आशा काळे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, “आयुष्यात खूप पुरस्कार झाले. पण आजचा हा कृतज्ञता पुरस्कार, खरोखर भारावून गेला. इतका सुंदर सोहळा कला जीवनामध्ये परमेश्वराने माझ्यासाठीच ठेवला होता, इतका छान होता. इथे आल्यानंतर, ज्यांच्यासोबत मी आत्तापर्यंत काम केली, ते सर्व कलाकार भेटायला मिळाले. कुणाबरोबर किती कसं बोलू हे मला सुचत नव्हतं. प्रत्येकाचा चेहरा बघून डोळ्यात पाणी येत होतं. आणि मी खरंच म्हटलं, देवा मला यासाठीच आतापर्यंत ठेवलंस का! आता मला खूप खूप आनंद झालाय.”
View this post on Instagram
ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे यांनी अभिनेता व दिग्दर्शक पुष्कर श्रोत्री याच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या ‘झिम्माड’ या विशेष पावसाळी पिकनिकमध्ये हजेरी लावली होती. या खास प्रसंगी त्यांचा कृतज्ञता पुरस्काराने सन्मान करण्यात आला. अभिनेत्री किशोरी शहाणे त्यांना मंचापर्यंत घेऊन आल्या. त्यानंतर त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
‘अष्टविनायक’, ‘हा खेळ सावल्यांचा’,’सासुरवाशीण’, ‘संसार’,’तांबडी माती’, अशा अनेक दर्जदार चित्रपटांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची दखल मराठी रसिकप्रेक्षकांना घ्यायला भाग पाडले. त्यांचे ‘निंबोणीच्या झाडामागे’ गाण आजही मराठी प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. या पावसाळी पिकनिकला मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी हजरी लावली होती.
रोहितच्या भविष्यावरून बीसीसीआय आणि निवड समितीत वाद? अजित आगरकरांची गच्छंती होण्याची शक्यता





