‘देवा’ ठरला फेल? शाहिद कपूरच्या चित्रपटाच्या कमाईत मोठ्या प्रमाणात घट

Shahid Kapoor | बॉलीवूड अभिनेता शाहिद कपूरचा ‘देवा’ बॉक्स ऑफिसवर आपली कमाल दाखवण्यास अपयशी ठरला आहे. या चित्रपटात शाहिद कपूर एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे, पण तरीही त्याने अपेक्षित यश मिळवलेले नाही. फक्त पाच दिवसांतच ‘देवा’ची कमाई मोठ्या प्रमाणात घटली आहे.
सुरुवातीला चित्रपटाने काही प्रमाणात चांगली कमाई केली, पण त्यानंतर त्याचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटले. पहिल्या दिवशी या चित्रपटाने ५.७८ कोटींपर्यंतची कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी ६.८२ कोटी, तिसऱ्या दिवशी ८.३० कोटी आणि चौथ्या दिवशी ३.३९ कोटी आणि पाचव्या दिवशी संध्याकाळपर्यंत ०.७८ कोटींची कमाई केली. आतापर्यंत चित्रपटाची एकूण कमाई ३९.०८ कोटी झाले आहे. तर हा चित्रपट ५० कोटी च्या बजेटमध्ये तयार करण्यात आला आहे. Shahid Kapoor |
‘देवा’ हा चित्रपट मल्याळम ‘हिट मुंबई पोलिस’ चा रिमेक आहे, पण त्याच्यासारखी जादू तो पुन्हा निर्माण करू शकलेला नाही. शाहिद कपूरचा दमदार अभिनय आणि अॅक्शन सीन प्रेक्षकांना आकर्षित करतील, अशी अपेक्षा होती. पण तसे झाले नाही.
यात पूजा हेगडेने पत्रकाराची भूमिका साकारली, पण तिची भूमिकाही चित्रपटात फार कमाल दाखवू शकली नाही. तर दुसरीकडे अक्षय कुमारचा ‘स्काय फोर्स’ हा चित्रपट सुपरहिट ठरत असल्याचे दिसत आहे. या चित्रपटाने १०० कोटी क्लबमध्ये प्रवेश करत बॉक्स ऑफिसवर दबदबा निर्माण केला आहे.
हेही वाचा:





