अंटार्क्टिकाला ग्लोबल वॉर्मिंगचा मोठा फटका

लंडन- जगातील सर्वच प्रदेशांना ग्लोबल वॉर्मिंगचा फटका बसत असताना आता बर्फाळ वातावरणासाठी आणि प्रदेशासाठी प्रसिद्ध असणाऱ्या अंटार्क्टिकालाही या ग्लोबल वार्मिंगचा जोरदार फटका बसला आहे. मार्च महिन्यात अंटार्टिकाचा एक मोठा तुकडा वितळून बाजूला पडला या तुकड्याचा आकार जवळजवळ लॉस एजेल्स शहराच्या आकाराएवढा होता.
सीएनएन वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त प्रकाशित केले असून या वृत्तामध्ये त्यांनी आकाशातील नद्या हा एक नवीन शब्दप्रयोग वापरला आहे आकाशात गरम वातावरनाचा जो एक पट्टा तयार होतो त्याचे वर्णन आकाशातील नद्या असा केला. असून या आकाशाचा नद्यांच्या गरम वातावरणाचा फटका पृथ्वीवरील सर्वच घटकांना बसतो आत्तापर्यंत तो पृथ्वीवरील इतर सर्व प्रदेशांना बसत असताना आता त्याचा सर्वात मोठा फटका अंटार्टिका या बर्फाळ प्रदेशला बसल्याचे लक्षात आले आहे.
यापूर्वी 1995 आणि 2002 या दोन वर्षांमध्ये अंटार्क्टिकाच्या असाच एक महाकाय तुकडा वितळून बाजूला झाला होता अंटार्टिकाच्या प्रदेशात आता एकच मोठा तुकडा शिल्लक असून आगामी कालावधीमध्ये परिस्थितीत बदल झाला नाही तर हा तुकडाही वितळून जाण्याचा धोका शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. सायन्स जर्नल कम्युनिकेशन अँड इन्व्हरमेंट या मासिकामध्ये याबाबतचा सविस्तर संशोधन अभ्यास प्रसिद्ध झाला आहे.
अंटार्क्टिकाच्या ज्या प्रदेशाला बर्फाचा चादरीने झाकून टाकले आहे त्या हळूहळू वितळून जात असल्याने संशोधकांनी या अहवालामध्ये चिंता व्यक्त केली आहे फक्त एक बर्फाळ प्रदेश आता बाकी आहे तो सुद्धा जर आगामी कालावधीमध्ये वितळून गेला तर समुद्राची पातळी मोठ्या प्रमाणावर वाढणार असून त्याचा फटका समुद्रकिनारी असणाऱ्या अनेक शहरांना बसणार आहे असा धोकाही या अभ्यासात व्यक्त करण्यात आला आहे.





