Bobby Deol : किंग खानचा मुलगा आर्यन खानने दिग्दर्शित केलेल्या “द बॅड्स ऑफ बॉलीवूड” या वेबसिरीजमध्ये अभिनेता बॅाबी देओल दिसला. या सिरीजमध्ये त्याने केलेल्या भूमिकेचे प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केले. सध्या सोशल मीडियावर बॅाबीच्या नव्या डॅशिंग लुकची जोरदार चर्चा होत आहे. तो लवकरच एका सिनेमामध्ये दिसणार आहे. अभिनेत्री आलिया भट शर्वरी स्टारर “अल्फा” सिनेमातील बॅाबीचा लुक असल्याचे बोलले जात आहे. या सिनेमात तो खलनायकाची भूमिका साकारणार आहे. त्याचा हा नवा लुक पाहून चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढलेली आहे. ही एक मोठी अपडेट असल्याचे सांगितले जात आहे. या लुकमध्ये “प्रोफेसर व्हाईट नॉइज” अशी ओळख बॅाबीने सांगितली आहे. View this post on Instagram A post shared by Bobby Deol (@iambobbydeol) १३ ऑक्टोबर रोजी बॉबी देओलने एक पोस्टर शेअर केली. ज्यामध्ये तो जाड काळ्या फ्रेमचा चष्मा आणि लांब केसांसह एका भयंकर अवतारात दिसत आहे. या पोस्टरमध्ये तो खूप वेगळा दिसत आहे. पोस्टरमध्ये हेलिकॉप्टर आणि लष्करी टँक दिसत आहेत, जे एका अॅक्शन-पॅक्ड थीमकडे संकेत दर्शवितात. “लवकरच येत आहे… प्रोफेसर व्हाइट नॉइजच्या भूमिकेत बॉबी देओल.” असे कॅप्शन फोटोला अभिनेत्याने दिले आहे. कामाच्या बाबतीत बोलायचे झाले तर, बॉबी देओल लवकरच आलिया भट आणि शर्वरीसोबत “अल्फा” या बिग बजेट सिनेमात दिसणार आहे. यशराज फिल्म्स या सिनेमाची निर्मिती करणार असून हा सिनेमा २५ डिसेंबर २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. हेही वाचा : “तालिबानी प्रहार, बलुचचा वार आणि भारताचा हुंकार” ; पाकिस्तानची झाली कोंडी