‘रंग माझा वेगळा’मधील दीपाने शेअर केले ग्लॅमरस फोटो, चाहते म्हणताहेत- परमसुंदरी!

छोट्या पडद्यावरील “रंग माझा वेगळा’ मालिकेने कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. या मालिकेतील दीपा हे पात्र तर सर्वांचे लाडके आणि आवडते आहे. मालिकेत दीपाची भूमिका अभिनेत्री रेश्मा शिंदेने साकारली आहे. रेश्मा सोशल मीडियावर नेहमी ऍक्टिव असते.
View this post on Instagram
ती तिचे काही फोटो व व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. तिच्या फोटोंना चाहत्यांची पसंतीदेखील मिळताना दिसते. दरम्यान, नुकतेच तिने सोशल मीडियावर ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. तिचा हा ग्लॅमरस लूक पाहून एका चाहत्याने तिला परमसुंदरीचा किताब दिला आहे.
View this post on Instagram
अभिनेत्री रेश्मा शिंदेने इंस्टाग्रामवर स्कर्ट टॉपमधील फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत तिने लिहिले की, घर प्रेमाने भरा तेव्हा ते घर बनते. तिचा हा नवा लूक पाहून चाहते तिच्या प्रेमात पडले आहेत.
View this post on Instagram
नेहमी चुडीदारमध्ये दिसणारी साधीभोळी दीपाचा हा ग्लॅमरस अवतार चाहत्यांना देखील आवडलेला आहे. दीपाच्या या फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिच्या या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे.
View this post on Instagram





