आ.आशुतोष काळेंना मंत्री करण्यासाठी मताधिक्य द्या : अभिनेते भाऊ कदम

कोपरगाव, (प्रतिनिधी): – महाराष्ट्र राज्याला प्रगतीच्या शिखरावर घेवून जाण्याची धमक आणि काम करण्याची ताकद उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे असून त्यांचा हाथ आ. आशुतोष काळे यांच्या पाठीवर आहे. हे आ.आशुतोष काळे यांनी केलेल्या कामावरून दिसून येते. अजितदादांचे हाथ बळकट झाले पाहिजे, यासाठी त्यांचे सर्व शिलेदार मोठ्या मताधिक्याने निवडून येणे गरजेचे आहे.
आ.आशुतोष काळे निवडून येणार आहे पण त्यांना मंत्री करायचे आहे, त्यासाठी आ.आशुतोष काळे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) स्टार प्रचारक व मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते भाऊ कदम यांनी केले.
कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार आ.आशुतोष काळे यांच्या प्रचारार्थ मतदार संघातील राहाता तालुक्यातील पुणतांबा येथे आ.आशुतोष काळे यांच्या समवेत प्रसिद्ध अभिनेते भाऊ कदम यांच्या जुने रेल्वे गेटपासून प्रचार रॅलीस प्रारंभ होवून स्टेशन रस्त्यावरून प्रचार फेरी काढण्यात आली होती.
या प्रचार फेरीचे नेहरू चौकात छोटेखानी सभेत रूपांतर झाले. यावेळी नागरिकांशी संवाद साधतांना ते बोलत होते. आ.आशुतोष काळे म्हणाले की, कोपरगाव मतदार संघातील इतर गावांप्रमाणे राहाता तालुक्यातील अकरा गावांना देखील समान न्याय दिला आहे.
वाकडी-रामपूरवाडी-पुणतांबा मजबुतीकरण करणे, गणेशनगर वाकडी रस्ता, वाकडी येथील श्री खंडोबा महाराज देवस्थान विकास, जळगाव-पुणतांबा-राहता-चितळी रोड,शिंगवे-वारी रस्ता, रामपूरवाडी- पुणतांबा रस्ता-नपावाडी-पुणतांबा रस्ता चांगदेव महाराज समाधी परिसर सभामंडप व स्वच्छतागृह, वाकडी येलमवाडी-पुणतांबा, पुणतांबा रेल्वे गेट ते चांगदेव महाराज समाधी मंदिर, पुणतांबा केटी वेअर दुरुस्ती आदी कामांचा समावेश आहे.
यापुढील काळात उर्वरित विकास कामे मार्गी लावण्यासाठी मी कटिबद्ध असून सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करून मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे, असे आवाहन आ.काळे यांनी केले. यावेळी गौतम बँकेचे माजी चेअरमन बाबासाहेब कोते, ज्येष्ठ नेते अॅड. मुरलीधर थोरात, शिवसेना (शिंदे गट)शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष धनंजय जाधव, माजी सरपंच डॉ. धनंजय धनवटे, राजेद्र धनवटे, संगीता भोरकडे, आण्णासाहेब कोते, गणेश थोरमोटे, बाळासाहेब चव्हाण, श्याम माळी, अॅड.संध्या थोरात, साहेबराव आदमाने, सुनील म्हसे, सुनील सांबरे, शाम जगताप, नितीन जगताप, अर्जुन बोंबले, चंद्रकांत वाटेकर, गणेश बनकर, सर्जेराव जाधव, राहुल धनवटे विजय धनवटे, बाळासाहेब बाबुळखे, पद्माकर सुरडकर, भाऊसाहेब जाधव, दीपक वाघ, नितीन वाघचौरे, सोपानराव वाघ, सोनाजी पगारे, रघुनाथ वाघ,रुपेश गायकवाड,बाबासाहेब उगले, सुनील कोते, भाऊसाहेब लहारे ,रामकृष्ण चव्हाण सुनील,थोरात बबलू पऱ्हे,शाम धनवटे,विलास पेटकर आदी उपस्थित होते.





