Pranit More : “मला एक संधी द्या”; मोठ्या वादानंतर प्रणित मोरेकडून माफीनामा! म्हणाला ‘माझी चूक झाली, मी तिरस्कारास..’
Pranit More : या प्रकरणामुळे प्रणित मोरे याच्यावर देखील टीकेची झोड उठली आहे. तो चांगलाच अडचणीत सापडला आहे.

Pranit More : स्टँड-अप कॉमेडियन प्रणित मोरे सध्या आपल्या शोमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. त्याच्या कार्यक्रमादरम्यान प्रेक्षकांपैकी हिमांशू जांगडा आणि डॉ. सेजल पवार यांनी केलेल्या कथित आक्षेपार्ह आणि अश्लील टिप्पण्यांमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. या दोघांचे व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून त्यावरून संतापाची लाट उसळली आहे.
या प्रकरणामुळे प्रणित मोरे याच्यावर देखील टीकेची झोड उठवली जात आहे. तो चांगलाच अडचणीत सापडला आहे. गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर त्याला आणि हिमांशू जांगडा तसेच डॉ. सेजल पवार यांना लक्ष्य केले जात असून राष्ट्रीय महिला आयोगानेही या प्रकरणाची दखल घेत कारवाईची भूमिका घेतली आहे.
मोठ्या वादानंतर अखेर प्रणित मोरेने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत सार्वजनिक माफी मागितली आहे. आपल्या व्हिडिओत तो म्हणाला, “ही भूमिका मला काही दिवसांपूर्वीच मांडायची होती. मात्र, माझे इन्स्टाग्राम खाते सस्पेंड झाल्यामुळे ते शक्य झाले नाही. माझ्या क्राऊड वर्कचा व्हिडिओ अनेकांनी पाहिला असेल. त्यानंतर माझ्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे आणि लोकांचा रागही ओढवून घेतला आहे. मला वाटते, हा रोषास मी पात्र आहे.”
हेही वाचा : Love Marriage: घरच्यांना लव्ह मॅरेज मान्य नाही? मग ‘या’ 5 गोष्टी टाळाच, नाहीतर वाढतील अडचणी

Pranit More : “मला एक संधी द्या”; मोठ्या वादानंतर प्रणित मोरेकडून माफीनामा! म्हणाला ‘माझी चूक झाली, मी तिरस्कारास..’
मी त्यावर भूमिका घेण्यात चुकलो (Pranit More )
संबंधित व्हायरल व्हिडिओवर स्पष्टीकरण देताना तो म्हणाला “त्या कार्यक्रमात संबंधित व्यक्तीने अनेक अपमानास्पद गोष्टी सांगितल्या होत्या आणि त्या वेळी प्रेक्षक त्यावर हसत होते. मात्र, या घटनेमुळे अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, याची मला जाणीव आहे. त्यामुळे मीदेखील त्यात वहावत गेलो. मी त्यावर भूमिका घेण्यात चुकलो,” अशी कबुली त्याने दिली आहे.
पुढे त्याने म्हटलं की, “मला वाटतं ही माझी खूप मोठी चूक आहे. मी हवं तर त्याला तिथेच थांबवू शकलो असतो किंवा भूमिका घेऊ शकलो असतो. पण मी हे करु शकलो नाही. मी त्याला एक प्लॅटफॉर्म दिला ज्यामुळे ही गोष्ट इतकी वाढली. यामुळे जे दुखावलेत त्या सर्वांची मी माफी मागतो. माझ्याविरोधात जी कायदेशीर कारवाई सुरु आहे त्यासाठी मी प्रशासनाला सहकार्य करत आहे”.
मला एक संधी द्या (Pranit More )
“तुम्ही सर्वांनी मला एक संधी द्या. मी चांगला व्यक्ती होऊन दाखवेन. मलाही यातून शिकायला मिळालं आहे. मी आता स्वत:वर आणि कंटेंटवर काम करत आहे. भविष्यात तुम्हाला माझ्या कामातून हे दिसेल,” असा दावा त्याने केला आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणामुळे स्टँड-अप कॉमेडीमधील मर्यादा, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सामाजिक जबाबदारी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.





