सगळ्यात जास्त मताधिक्य द्या, प्रकाश आबिटकरांना मंत्री करतो; एकनाथ शिंदेनी केली घोषणा

कोल्हापूर : आज कोल्हापूरमध्ये राधानगरी – भुदरगड तालुक्यातील शासकीय इमारती व विविध विकास प्रकल्पांच्या भूमिपूजन तथा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी एकनाथ शिंदेनी एक मोठी घोषणा केली. यावेळी त्यांनी आमदार प्रकाश आबिटकरांना मंत्री करतो अशी घोषणा भरसभेत केली.
काय म्हणाले एकनाथ शिंदे?
“लोकसभेला खोटं बोलून फसवलं आता लोक फसणार नाही. एक बार मैने कमेटमेंट किया तो मै खुद की भी नहीं सूनता! प्रकाश आबिटकर यांना मंत्रिमंडळात स्थान देणार आहे. सगळ्यात जास्त मताधिक्य आबिटकर यांना द्या मी त्यांना मंत्री करतो”, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज कोल्हापूरमध्ये केली.
आम्ही फक्त घोषणा करत नाही. घोषणा पूर्ण केली की विरोधकांच्या पोटात गोळा येतो. प्रकाश आबिटकर यांच्या समोर उभा राहील त्याचे डिपॉझिट जप्त होईल. सगळे विकास प्रकल्प बंद होते ते आम्ही सुरू केले. जर आम्ही बंड करून वेगळा निर्णय घेतला नसता तर आज जी उद्घाटन झाली ती झाली नसती असे एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.





