नरसिंह राव यांना भारतरत्न द्या
देशाचे पंतप्रधान पद भूषविणारे दक्षित भारतातील पहिले नेते आणि तेलंगणचे सुपुत्र असलेले नरसिंह राव यांचे तैलचित्र संसदेच्या परिसरात लावण्यात यावे, अशी मागणीही यावेळी मंजूर करण्यात आलेल्या प्रस्तावात करण्यात आली आहे.

हैदराबाद – भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत पी. व्ही. नरसिंह राव यांना भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च किताब देण्यात यावा, अशी मागणी करणारा प्रस्ताव तेलंगणा विधानसभेत एकमुखाने मंजूर करण्यात आला.
देशाचे पंतप्रधान पद भूषविणारे दक्षित भारतातील पहिले नेते आणि तेलंगणचे सुपुत्र असलेले नरसिंह राव यांचे तैलचित्र संसदेच्या परिसरात लावण्यात यावे, अशी मागणीही यावेळी मंजूर करण्यात आलेल्या प्रस्तावात करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे हैदराबादच्या विद्यापीठालाही राव यांचे नाव दिले जावे असा आग्रह आमदारांनी धरला आहे.
यासंदर्भात मांडण्यात आलेल्या प्रस्तावात तेलंगणचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव म्हणाले की, जर पंडित जवाहरलाल नेहरू यांना आधुनिक भारताचे शिल्पकार म्हटले जात असेल तर नरसिंह राव यांना मेकर ऑफ ग्लोबल इंडिया म्हटले जाईल.





