‘या लोकांसाठी…’, गिरीराज सिंह यांच्याकडून राहुल गांधींची तेजस्वी यादवशी तुलना

Giriraj Singh Attack Rahul Gandhi । काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वक्तव्यानंतर देशभरातील राजकारण तापले आहे. त्याचवेळी केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी राहुल गांधी यांना यावरुन घेरले आहे. त्यांनी आज “देशाच्या राजकारणात जर कोणता मोठा कलंक असेल तर तो राहुल गांधींचा आहे.” असे वक्तव्य त्यांनी केले.
पुढे बोलताना त्यांनी,”बिहारचे राजपुत्र परदेश दौऱ्यावर गेले होते आणि आता देशाचे राजकुमार परदेश दौऱ्यावर जाणार आहेत. या लोकांसाठी राजकारण हे मनोरंजनाचे साधन आहे, तर नरेंद्र मोदी देशाला आपले कर्तव्य मानून त्यानुसार काम करतात.” असे त्यांनी म्हटले.
राहुल गांधींच्या विधानावरुन गदारोळ Giriraj Singh Attack Rahul Gandhi ।
राहुल गांधींच्या हिंदूंबाबत केलेल्या वक्तव्यावरुन अजूनह देशात गदारोळ सुरु आहे. 2 जुलै रोजी संसदेत हिंदू धर्मावर भाष्य करताना राहुल गांधी म्हणाले होते की, हा अहिंसेचा देश आहे. ते घाबरत नाही. घाबरू नका, घाबरू नका आणि त्रिशूळ जमिनीत गाडून टाका हा संदेश आपल्या महापुरुषाने दिला. तर स्वतःला हिंदू म्हणवणारे चोवीस तास हिंसा-हिंसा, द्वेष-द्वेषात गुंततात. राहुल गांधी म्हणाले होते की, पंतप्रधान मोदी, भाजप आणि आरएसएस हा संपूर्ण हिंदू समाज नाही.
यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पलटवार करत हा अतिशय गंभीर मुद्दा असल्याचे म्हटले होते. हा निव्वळ योगायोग आहे की काही प्रयोगाची तयारी आहे?
राहुल गांधी भाजपच्या निशाण्यावर Giriraj Singh Attack Rahul Gandhi ।
राहुल गांधींच्या हिंदू धर्मावरील वक्तव्यानंतर देशभरात भाजपचा निषेध होत आहे. सोबतच हिंदू समाजातही संताप आहे. या मुद्द्यावरून जोरदार राजकारण सुरू आहे. राहुल गांधी भाजपच्या निशाण्यावर आले आहेत. भडक विधाने आणि आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत.





