भारतीय क्रिकेट संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत मोठा धक्का बसला आहे. कर्णधार शुभमन गिलला पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी (१५ नोव्हेंबर २०२५) इडन गार्डन्स मैदानावर नेक इंजुरीचा त्रास झाला, ज्यामुळे त्याला रिटायर्ड हर्ट होऊन मैदान सोडावे लागले. त्यानंतर थेट रुग्णालयात दाखल करण्यात आले यानंतर तो पहिल्या कसोटीच्या उर्वरित भागातून बाहेर पडला. ही दुखापत इतकी जास्त गंभीर आहे त्यामुळे त्याला पुढील काही दिवस आराम करावा लागणार आहे. गुवाहाटीतील दक्षिण आफ्रिकेविरूद्ध दुसरा कसोटी सामन्यात शुभमन गिल दिसणार नसल्याचे स्पष्ट आहे. या दुखापतीमुळे भारतीय संघाने पहिल्या कसोटीत अपेक्षेपेक्षा वाईट कामगिरी केली. दक्षिण आफ्रिकेने भारताला १२४ धावांचे लक्ष्य दिले होते, पण भारत ९३ वर ऑल आऊट होऊन ३० धावांनी पराभूत झाला. चारही डावांमध्ये कोणत्याही संघाने २०० धावांचा टप्पा गाठला नाही, ज्यामुळे इडन गार्डन्सची खेळपट्टी केंद्रस्थानी आली. भारतीय संघाने खेळपट्टीवर ‘थोडा टर्न’ मागितला होता, पण तो इतका जास्त झाला की, भारतीय फलंदाजच त्यात अडकले. सायमन हार्मर (४/२१) आणि मार्को जानसेन (२/१५) यांनी भारतीय फलंदाजांना आपल्या जाळ्यात अडकवले. खेळपट्टीवरून गंभीर-गिल वाद खेळापेक्षा अधिक लक्ष गाैतम गंभीरचे खेळपट्टीवर आहे. दक्षिण आफ्रिकेला रोखण्यासाठी इडन गार्डन्सची खेळपट्टी बदलण्यात आली. मात्र, सर्वकाही उलटे झाले आणि थेट भारतीय फलंदाजच यामध्ये अडकले. भारताच्या संघाला 124 धावांचे आव्हानही गाठता आले नाही. भारतीय फलंदाजी अपयशी ठरली. दक्षिण आफ्रिकेला फसवण्याच्या चक्करमध्ये भारतीय संघाचेच तीनतेरा वाजले. यामुळे गंभीर आणि गिल यांच्यातील मतभेद हळूहळू समोर येऊ लागले आहेत. या वादामुळे रोहित शर्माच्या कर्णधारपदानंतर गिलवरही गंभीर यांचा ‘निशाणा’ असल्याचे बोलले जात आहे. रोहितने टी२० वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकवली होती, तरी गंभीर यांच्याशी मतभेदांमुळे त्याचे कर्णधारपद गेले. आता अवघ्या काही महिन्यांत गिलशीही तणाव वाढताना दिसतोय. गिलच्या अनुपस्थितीत ऋषभ पंतने कर्णधारपद सांभाळले, पण संघाला विजय मिळवता आला नाही. दुसऱ्या कसोटीपूर्वी गिलची पूर्ण बरे होण्याची शक्यता कमी असली, तरी नितीश कुमार रेड्डी याला संघात परत बोलावण्यात आले आहे. ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५-२७ चा भाग असल्याने, भारतासाठी प्रत्येक गुण महत्त्वाचा आहे. गंभीर यांच्या नेतृत्वाखालील संघ आता गुवाहाटीमध्ये पुनरागमन करतो का? हे पाहणे रोचक ठरणार आहे.