‘प्रेमापेक्षा गिफ्ट्स महत्त्वाची वाटतात’; नीना गुप्ता पुन्हा एकदा चर्चेत

Bollywood News | अभिनेत्री नीना गुप्ता आपल्या परखड मतांमुळे नेहमीच चर्चेत असतात. एका मुलाखतीत त्यांनी प्रेमापेक्षा मला गिफ्ट्स अधिक महत्त्वाची वाटतात, असे विधान केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्या विधानाची चर्चा रंगली आहे.
नीना गुप्ता म्हणाल्या की, “आजकाल केवळ भावना पुरेशा नाहीत, तर त्या दाखवण्यासाठी कृती आवश्यक असते. तुम्ही म्हणता की तुम्ही मला प्रेम करता, पण तुम्ही काहीच देत नाही, तर मला ते प्रेम समजत नाही. प्रेमाचा अर्थ काय? मूर्खपणा. प्रेम दाखवायला काहीतरी द्यावं लागतं, ते गिफ्ट असो, वेळ असो, किंवा समोरच्या व्यक्तीकडे दिलेलं लक्ष. मला माझ्या बँक खात्यात पैसे दिसले की शांती वाटते. लोक म्हणतात, प्रेम सगळं काही असतं. पण मी म्हणते, पैसे असले की प्रेम टिकतं. मुलांना चुकीचे संदेश देऊ नका की पैसा वाईट आहे. पैसे खूप महत्त्वाचे आहेत.”
त्यानंतर नीना गुप्ता यांनी त्यांच्या एका मैत्रिणीसोबत झालेल्या चर्चेविषयी सांगितलं. नीना यांनी म्हटलं की, ‘एकदा माझ्या मैत्रिणीनं मला खूप चांगली गोष्ट सांगितली. मी तक्रार करत होते ती माझा नवरा असं करत नाही किंवा तिचा नवरा असं करत नाही. तर तिनं मला समजावलं की तू तुझ्या नवऱ्याला सांग की प्रेमात प्रॉपर्टी, दागिने, कपडे या सगळ्या गोष्टी देखील असतात. जर मी फक्त इतकं सांगितलं की माझं तुझ्यावर प्रेम आहे, मी खूप प्रेम करते… पण हे पुरेसे नाही. तुला देखील काही करावं लागेल. काही द्यावं लागेल. कमीत कमी माझ्या वाढदिवसाला एक साडी तर द्यायला हवी.’ Bollywood News |
दरम्यान, ‘पंचायत ४’मधील मंजु देवीच्या भूमिकेत नीना गुप्तांचे काम पुन्हा एकदा लक्षवेधी ठरले. सध्या नीना गुप्ता ‘मेट्रो इन दिनों’ मध्ये दिसल्या आहेत. या चित्रपटात आदित्य रॉय कपूर, सारा अली खान, फातिमा सना शेख, अली फजल, अनुपम खेर, पंकज त्रिपाठी, कोंकणा सेन शर्मा आणि नीना या महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. Bollywood News |
हेही वाचा:





