शंभर टक्के घरपट्टी भरल्यास राष्ट्रध्वजाची भेट

सातारा – नागरिकांनी 1 एप्रिल 2022 नंतर घरपट्टी व पाणीपट्टीची संपूर्ण रक्कम अदा केली आहे व जे नागरिक 14 ऑगस्टपर्यंत कर जमा करतील, अशा नागरिकांना राष्ट्रध्वज भेट देण्याचा निर्णय सातारा पालिकेच्या प्रशासकीय सभेत मंजुर करण्यात आला. शासनाच्या ‘हर घर झंडा’ या अभियानांतर्गत असा निर्णय घेणारी सातारा ही जिल्ह्यातील एकमेव पालिका ठरली आहे.
पालिकेची सहावी प्रशासकीय सभा मंगळवारी सायंकाळी चार वाजता मुख्याधिकारी तथा प्रशासक अभिजित बापट यांच्या अध्यक्षतेखाली पालिकेच्या कमिटी हॉलमध्ये पार पडली. यावेळी मुख्य लेखापाल आरती नांगरे, सहायक लेखापाल हिम्मत पाटील, मुख्य अभियंता दिलीप चिद्रे, लेखा परीक्षक कल्याणी भाटकर, लेखा विभाग लिपिक भालचंद्र डोंबे, बांधकाम अभियंता अनंत प्रभुणे, सुधीर चव्हाण यांच्यासह आरोग्य, बांधकाम, पाणीपुरवठा विभागाचे विभागप्रमुख उपस्थित होते. सभा सचिव अतुल दिसले यांनी मागील सभेचे इतिवृत्त मांडले. अजेंड्यावर विविध विभागांशी संबंधित 67 विषय घेण्यात आले होते. प्रत्येक विषयावर तपशीलवार चर्चा झाली. गणेशोत्सव तोंडावर आला आहे.





