‘घालीन लोटांगण, वंदिन चरण..’; सभेपूर्वी उद्धव ठाकरेंना डिवचलं; ठाण्यातील बॅनरबाजीने वेधलं लक्ष

Thane Banner Against Uddhav Thackeray | आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. नेत्यांनीही मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरूवात केली आहे. त्या पार्श्वभूमीवर आज ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे ठाणे दौऱ्यावर येणार आहेत. मात्र उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याआधी ठाण्यातील बॅनरबाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
ठाणे शहरामध्ये आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मेळावा पार पडणार आहे. गडकरी रंगायतन नाट्यगृहात आज संध्याकाळी हा मेळावा होणार असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यावेळी मार्गदर्शन करणार आहेत. ठाकरेंच्या दौऱ्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यामध्ये राजकारण चांगलेच तापले आहे. ठाण्यामध्ये ‘घालीन लोटांगण’ या आशयाचे बॅनर लावत उद्धव ठाकरेंना डिवचण्यात आले आहे. Thane Banner Against Uddhav Thackeray |
बॅनरवर नेमकं काय आहे ?
या बॅनरवर ‘घालीन लोटांगण, वंदिन चरण..’ हा आशय आहे. यात खासदार शरद पवार, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी यांच्या समोर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे संजय राऊत यांचा फोटो आहे. तर उद्धव ठाकरे खाली वाकलेले दिसत आहे. या बॅनरवर कुठल्याही प्रकारचे नाव किंवा पुरावा ठेवलेला नाही. या बॅनरवरुन राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे, त्यामुळे पोलिसांकडून हे बॅनर्स हटवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच आजच्या ठाकरेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. Thane Banner Against Uddhav Thackeray |
उद्धव ठाकरेंचा दिल्ली दौरा
उद्धव ठाकरे यांनी तीन दिवसीय दिल्ली दौऱ्यात सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पहिल्यांदाच ठाकरे-गांधी यांची भेट झाली. यावेळी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीबाबत दिल्लीत महत्त्वाची बैठक पार पडली.
हेही वाचा:





