पहिली कार परत मिळावी – सचिन
Updated On:

मुंबई – स्वकमाईतून विकत घेतलेली पहिली मारुती 800 कार पुन्हा मिळविण्यासाठी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आता सोशल मीडियावरून चाहत्यांनाच मदत करण्याचे आवाहन केले आहे. ही कार ज्या व्यक्तीला मी विकली त्याच्याकडून ही कार परत घेण्यासही मी उत्सुक आहे, अशा शब्दांत सचिनने आपल्या पहिल्या कारबाबतच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
पहिली कार आजही अनेकांच्या भावनेचा प्रश्न बनतो. सचिनलाही आपली पहिली कार पुन्हा परत मिळावी अशी हूरहूर लागली आहे. ज्या व्यक्तीला मी ही कार विकली त्याचा शोध लागला तर ही कार परत देण्याचा हट्टही मी करेन, असे सचिनने एका चॅट शोमध्ये बोलताना सांगितले.





