War 2 teaser : गेट रेडी टू वॅार…! टीझरमध्येच उडवला धुराळा…; हृतिकसोबत ज्युनिअर एनटिआरचा अॅक्शन अवतार

War 2 teaser : २०१९ मध्ये रिलीज झालेल्या ‘वॅार’ या चित्रपटाने बॅालीवूड इंडस्ट्रीत धूमाकूळ घातला होता. या चित्रपटात हृतिक रोशन आणि टायगर श्रॅाफ यांनी आपल्या दमदार अभिनय आणि अॅक्शनमुळे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. चित्रपटात दाखविण्यात आलल्या अॅक्शन सीन्सचे मोठ्या प्रमाणावर कौतुक करण्यात आले. यानंतर चित्रपटाच्या मेकर्सनी ‘वॅार २’ ची घोषणा करून चाहत्यांमध्ये चित्रपटाच्या पुढच्या भागाविषयी उत्सुकता निर्माण केली होती.
अखेर प्रतीक्षा संपली असून वॅार २ चा खतरनाक टीझर रिलीज झाला आहे. १४ अॅागस्ट हा चित्रपट थिएटर्समध्ये रिलीज करण्यात येणार आहे. चित्रपटाच्या टीझरने सर्वत्र धूमाकूळ उडवून दिला आहे. यामुळे ट्रेलर आणि चित्रपट कसा असेल याविषयी चर्चा केली जात आहे.
या चित्रपटात टायगरची जागा दाक्षिणात्य कलाकार ज्युनिअर एनटीआर या अभिनेत्याने घेतली असून, तो या चित्रपटात नेगेटीव्ह रोलमध्ये दिसणार आहे. तर हृतिक पुन्हा एकदा कबीर या पात्रातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटातील दोन्ही कलाकारांनी वॅार २ चा टीझर आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केला आहे. This time, the war has no rules. असे कॅप्शन देत अभिनेता ज्युनिअर एटीआरने वॅार २ चा टीझर शेअर केला आहे.
This time, the war has no rules. Watch #War2Teaser now.
Hindi Teaser – https://t.co/Lrt6zXoHc1
Telugu Teaser – https://t.co/xyVRg49ISS
Tamil Teaser – https://t.co/7beRIFNfnB#War2 only in theatres from 14th August. Releasing in Hindi, Telugu and Tamil. @iHrithik… pic.twitter.com/RRjY8JmIKx— Jr NTR (@tarak9999) May 20, 2025
वॉर २ या बहुप्रतिक्षित चित्रपटाद्वारे दाक्षिणात्य सुपरस्टार ज्युनियर एनटीआर बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. आज एनटीआरचा वाढदिवस असल्याने त्याने वाढदिवसाच्या निमित्ताने चाहत्यांना हे मोठं गिफ्ट दिले आहे. ‘वॉर २’ हा यश राजच्या गुप्तहेर विश्वाचा एक भाग आहे. वॅार चित्रपट २०१९ मध्ये प्रदर्शित झाला होता. हृतिक रोशनच्या ‘वॉर’ चा सिक्वल वॅार २ हा चित्रपट असणार आहे. चित्रपटात कोणतं नवं मिशन घेऊन कबीर प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे औचिक्याचे असणार आहे.





