नव्या वर्षात खळखळून हसायला मिळणार; ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ची रिलीज डेट जाहीर

Punha Ekda Sade Made Teen | ‘साडे माडे तीन’ या सिनेमाचा सिक्वेल लवकर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ‘कुरळे ब्रदर्स’ पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर धमाल करण्यासाठी सज्ज झाले आहेत. नुकतंच ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ या बहुप्रतिक्षित चित्रपटाचं नवं पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले असून यात चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे.
हा चित्रपट येत्या 30 जानेवारी 2026 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तब्बल 19 वर्षांनंतर ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’च्या माध्यमातून जुन्या आठवणींना उजाळा मिळणार आहे. या वेळी सिनेमात गोंधळ डबल पाहायला मिळेल आणि धमालही डबल! पोस्टरमुळे प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढली आहे.
View this post on Instagram
‘साडे माडे तीन’चा पहिला भाग प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस पडला होता. विशेष म्हणजे या पहिल्या भागाप्रमाणे या चित्रपटाचे दिग्दर्शनही अंकुश चौधरीनेच केले आहे. Punha Ekda Sade Made Teen |
यात अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव, रिंकू राजगुरू, संकेत पाठक, संजय नार्वेकर आणि समृद्धी केळकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. येत्या 30 जानेवारी 2026 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला हा चित्रपट येणार असल्याने आता मराठी प्रेक्षकांची वर्षाची सुरुवात खळखळून हसून होणार आहे. Punha Ekda Sade Made Teen |
हेही वाचा:
मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्याच्या घराला लागली आग! दुर्घेटनेत वाचला जीव, व्हिडीओ शेअर करत म्हणाला…





