कोपरगाव : कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे आ.आशुतोष काळे यांनी दुसऱ्यांदा विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेतली आहे. मतदार संघाचा व राज्याच्या विकासासाठी जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी उच्चशिक्षित असलेल्या आ.आशुतोष काळेंच्या रूपाने त्यांचा राज्याच्या मंत्रीमंडळात समावेश व्हावा, याकरिता आ.आशुतोष काळेंची जन्मभूमी असलेल्या माहेगाव देशमुख ग्रामस्थांनी सोमवारी ग्रामदैवत अमृतेश्वरला महाभिषेक करून प्रार्थना केली. आ.आशुतोष काळे यांना विधानसभा निवडणुकीत राज्यात सर्वाधिक पाच नंबरचे मताधिक्य मिळाले असून, ते तब्बल १ लाख २४ हजार ६२४ मतांनी निवडून आले आहे. हे मताधिक्य अहिल्यानगर जिल्ह्यातील निवडून आलेल्या १२ आमदारांमध्ये नंबर एकचे आहे. जिल्ह्यात आघाडीवर असणाऱ्या कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर साखर कारखान्याची धुरा सांभाळतांना माजी आ.अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आपल्या नेतृत्व व बुद्धी कौशल्यातून कारखाना तोटामुक्त करून दाखविला आहे. आ. आशुतोष काळे उच्च शिक्षित असून त्यांच्याकडे विकासाचे व्हिजन आहे. मागील पाच वर्षांत, त्यांनी मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी उत्कृष्ट कामगिरी बजावली असून त्यामागे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विशेष भूमिका आहे. आ.आशुतोष काळे यांनी नुकतीच दुसऱ्यांदा विधानसभा सदस्य म्हणून शपथ घेतली आहे. लवकरच मंत्रीमंडळाचा विस्तार होणार आहे. आ.आशुतोष काळे यांच्या ऐतिहासिक कामगिरीमुळे त्यांना महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात स्थान मिळावे, अशी अपेक्षा त्यांच्या समर्थकांमध्ये आहे. त्यांची जन्मभूमी असलेल्या माहेगाव देशमुख ग्रामस्थांनी आ. आशुतोष काळे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे म्हणून ग्रामदैवत अमृतेश्वर महादेवचरणी महाभिषेक करून प्रार्थना केली.यावेळी माहेगाव देशमुखचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.