Tokyo Olympics : प्रेरणादायी चपराक
Updated On:

टोकियो – टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत काही अनाकलनीय परंपराही पाहायला मिळत आहेत. एखाद्याला खरोखऱ फटकावले तरीही तो खेळाडू आनंदात राहिलेला कोणी पाहिला आहे का. अशीच एक घटना यंदाच्या स्पर्धेत घडली.
जर्मनीची ज्योदोपटू मार्टिना ट्राजडोसचा हंगेरीच्या सोझी ओजबसविरुद्ध बाद फेरीचा सामना होता. सामना सुरू होण्यापूर्वी प्रशिक्षकाने मार्टिनाची कॉलर पकडत तिच्या गालावर जोरदार फटका मारला.
या सामन्यात ट्राजडोसला पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र, तिने ही आमची परंपरा असल्याचे सांगत या घटनेला पूर्णविराम दिला.
मार्टिनाने स्वत: हा व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. सामन्याआधी केला जाणारा हा धार्मिक संस्कार आहे. त्यामुळे प्रशिक्षकांनी ही कृती मुद्दाम केली नाही, असेही तिने हा व्हिडिओ शेअर करताना सांगितले आहे.





