Geo News Ban: अखेर शहबाज सरकार कट्टरपंथीयांसमोर झुकले ! पाकिस्तानच्या सर्वात मोठ्या वृत्तवाहिनी जिओ न्यूजवर बंदी घातली ; हा निर्णय का घेतला? जाणून घ्या
Geo News Ban: पाकिस्तानमध्ये माध्यमांवर मोठी कारवाई झाली आहे. पाकिस्तानी सरकारने देशातील सर्वात मोठ्या वृत्तवाहिन्यांपैकी एक असलेल्या 'जिओ न्यूज'चा टीव्ही परवाना आणि प्रसारण १५ दिवसांसाठी निलंबित केले आहे.

Geo News Ban: पाकिस्तानमध्ये माध्यमांवर मोठी कारवाई झाली आहे. पाकिस्तानी सरकारने देशातील सर्वात मोठ्या वृत्तवाहिन्यांपैकी एक असलेल्या ‘जिओ न्यूज’चा टीव्ही परवाना आणि प्रसारण १५ दिवसांसाठी निलंबित केले आहे.
सरकारचा दावा आहे की, वाहिनीवरील एका कार्यक्रमात धार्मिक भावना दुखावणारी दृश्ये दाखवण्यात आली. या प्रकरणाची पुढील चौकशी सुरू करण्यात आली आहे.
जिओ न्यूजवर १५ दिवसांची बंदी Geo News Ban:
पाकिस्तानी सरकारच्या अखत्यारीत कार्यरत असलेल्या पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक मीडिया रेग्युलेटरी अथॉरिटीने (पेमरा) मध्यरात्री एक आदेश जारी करून जिओ न्यूजचा टीव्ही परवाना आणि प्रसारण १५ दिवसांसाठी निलंबित केले आहे.
धार्मिक भावना दुखावल्याचे आरोप
पेमराच्या आदेशात म्हटले आहे की, जिओ न्यूजने शुक्रवारी सकाळी प्रसारित केलेल्या ‘सफर-ए-इश्क’ या कार्यक्रमात धार्मिक भावना दुखावणारी दृश्ये दाखवली. याच्या आधारावर वाहिनीवर कारवाई करण्यात आली आहे.

हे प्रकरण चौकशीसाठी नियामक परिषदेकडे पाठवले
पेमराने पुढील कायदेशीर कारवाईसाठी हे प्रकरण नियामक परिषदेकडे पाठवले आहे. चौकशीनंतर पाकिस्तानी कायद्यानुसार पुढील कारवाई केली जाईल. नियामक प्राधिकरणाने जिओ न्यूजला या संपूर्ण प्रकरणाची अंतर्गत चौकशी करण्याचे निर्देशही दिले आहेत. चॅनलला कार्यक्रमाच्या प्रसारणाचे आणि त्यासंबंधित तथ्यांचे पुनरावलोकन करून अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.
तक्रारीनंतर केलेली कारवाई Geo News Ban:
मिळालेल्या माहितीनुसार, मरकझी जमियत अहले हदीसचे प्रमुख इब्तिशाम जहीर यांच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली. इब्तिशाम जहीर हे दहशतवादी संघटना लश्कर-ए-तोयबाचे नेते हाफिज मुहम्मद सईद यांचे दीर्घकाळचे सहकारी असल्याचेही म्हटले जाते. या तक्रारीनंतर पाकिस्तानी सरकारने जिओ न्यूजवर ही कारवाई केली.





