गावसकरांनी केले पंतचे कौतुक
Updated On:

केपटाऊन – टीकेला टीकेनेच उत्तर न देता आपल्या कामगिरीने उत्तर द्यावे, हा विक्रमादित्य सुनील गावसकर यांनी दिलेला सल्ला शिरसावंध मानून भारताचा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतने शतकी खेळी केली. त्याच्या याच कृतीचे खुद्द गावसकर यांनी कौतुक केले आहे.
पंतने गुरुवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात दुसऱ्या डावात दमदार शतकी खेळी केली. त्याच्या खेळीवर गावसकर यांच्यापासून अनेक आजी माजी क्रिकेटपटूंनी आनंद व्यक्त केला आहे.





