“देशात योग्य वेळी…योग्य व्यक्ती… “; एनडीएच्या बैठकीत चंद्राबाबू नायडूंकडून मोदींवर स्तुतीसुमने

Chandrababu Naidu। भाजपप्रणित एनडीएची दिल्लीत बैठक होत आहे. या बैठकीत एनडीएचे सर्व नवनिर्वाचित खासदार सहभागी झालेत. बैठकीला संबोधित करताना भाजपचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह यांनी एनडीएचे नेते म्हणून नरेंद्र मोदी यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. ते म्हणाले की, गेल्या 10 वर्षात पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली ज्याप्रकारच्या कामाची देशात आणि जगात प्रशंसा झाली आहे.
मोदींनी 3 महिने कधीही आराम केला नाही Chandrababu Naidu।
दरम्यान, राजनाथ सिंह यांनी सादर केलेल्या प्रस्तावाला टीडीपी अध्यक्ष एन चंद्रबाबू नायडू यांनी अनुमोदन दिले. TDP प्रमुख चंद्राबाबू नायडू NDA संसदीय पक्षाच्या बैठकीत म्हणतात, “आम्ही सर्वांचे अभिनंदन करत आहोत कारण आम्हाला जबरदस्त बहुमत मिळाले आहे. मी निवडणूक प्रचारादरम्यान पाहिले आहे की, पीएम मोदींनी 3 महिने कधीही आराम केला नाही. त्याला रात्रंदिवस विश्रांती नव्हती. त्याच भावनेने सुरुवात केली आणि त्याच भावनेने संपली. आंध्र प्रदेशमध्ये आम्ही 3 जाहीर सभा आणि 1 मोठी रॅली काढली आणि यामुळे आंध्र प्रदेशातील निवडणुका जिंकण्यात मोठा फरक पडला.” असे म्हटले.
देशात योग्यवेळी योग्य व्यक्ती देशाचे नेतृत्व Chandrababu Naidu।
चंद्राबाबू नायडू म्हणाले, “केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी (आंध्र प्रदेशात) अतिशय शक्तिशाली जाहीर सभेला संबोधित केले आणि त्यामुळे मोठा बदल घडून आला. अनेक नेते आंध्र प्रदेशात आले आणि रॅलींना संबोधित केले. यामुळे लोकांना विश्वास मिळाला की केंद्र त्यांच्यासोबत आहे आणि पीएम मोदींच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने गेल्या 10 वर्षांत अनेक पुढाकार घेतले आहेत. असे त्यांनी म्हटले. तसेच नायडू यांनी देशात योग्यवेळी योग्य व्यक्ती देशाचे नेतृत्व करत असल्याचे म्हणत मोदींवर स्तुतिसुमने उधळली.
या बैठकीत भाजप अध्यक्ष जेपी नड्डा म्हणाले की, देशाच्या सेवेसाठी प्रत्येक क्षण घालवणाऱ्या पंतप्रधानांचे आम्ही मनापासून अभिनंदन करतो. यामुळेच आज भारत इतिहास रचत आहे आणि एनडीए सलग तिसऱ्यांदा बहुमताने सरकार बनवत आहे. पंतप्रधान मोदींचा शपथविधी रविवारी ९ जून रोजी होणार आहे. लोकसभा निवडणुकीचे निकाल हाती आले असून यावेळीही एनडीएला बहुमत मिळाले आहे. यावेळी त्यांनी 293 जागा जिंकल्या आहेत. मात्र, भाजपला बहुमत मिळालेले नाही.





