चेन्नई – रविवारी चेन्नईच्या चेपॉक स्टेडिअमवर चेन्नई सुपर किंग विरुद्ध कोलकाता नाईट रायडर असा सामना रंगला. या सामन्यामध्ये केकेआर ने चेन्नईचा 6 विकेट्सनी पराभव केला. परंतु चेन्नईच्या चाहत्यांची नाराजी जास्त काळ टिकली नाही धोनीने सामना संपल्यानंतर आपल्या चाहत्यांना खुश केले आहे.
धोनी आणि संपूर्ण टीमने मैदानात फिरून चाहत्यांना काही भेटवस्तू दिल्या आहेत. तसेच या आनंदाच्या वातावरणात माजी क्रिकेट पटू सुनील गावस्कर यांनी आपल्या शर्टवर एमएस धोनीचा ऑटोग्राफ घेतला आहे. या प्रसंगाचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
दरम्यान, धोनीची खेळाडू म्हणून ही शेवटची आयपीएल असू शकते. धोनीने आयपीएलमध्ये आतपर्यंत सीएसकेला 4 वेळा चॅम्पियन बनवले आहे. तसेच सध्या सुरु असलेल्या हंगामध्येही संघ चांगली कामगिरी करत आहे.
जर सीएसकेने 20 मे रोजी दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला तर ते प्लेऑफमध्ये प्रवेश करेल. आणि जर जिंकला नाही तर चेन्नईचा संघ इतर संघांच्या कामगिरीवर अवलंबून असेल.