Gautami patil: लोकप्रिय नृत्यांगना गौतमी पाटील पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे. तिचं नवं गाणं ‘सोनचाफा’ नुकतंच प्रदर्शित झालं असून, काही तासांतच हे गाणं प्रचंड लोकप्रिय झालं आहे. मोहक अदांनी घातला धुमाकूळ गौतमी पाटील तिच्या स्टाईल आणि डान्समुळे नेहमी चर्चेत असते. ‘सोनचाफा’ या गाण्यात तिचा भन्नाट परफॉर्मन्स पाहायला मिळतो. “माझ्या रुपावर फिदा झाली दुनिया सारी” या गाण्याच्या ओळीप्रमाणेच प्रेक्षक खरंच तिच्या अदांवर फिदा झाले आहेत. चाहत्यांचा जबरदस्त प्रतिसाद हे गाणं ‘साईरत्न एंटरटेनमेंट’ या निर्मिती संस्थेने सादर केलं आहे. गाणं रिलीज होताच सोशल मीडियावर चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. लूक, गाण्याच्या ओळी आणि डान्स स्टेप्समुळे हे गाणं रसिकांना थिरकायला भाग पाडत आहे. गौतमी आणि निर्मात्यांची प्रतिक्रिया या गाण्याबद्दल बोलताना गौतमी म्हणाली, “साईरत्न एंटरटेनमेंटसोबतचं हे माझं तिसरं गाणं आहे. शूट करताना खूप मज्जा आली आणि माझ्या चाहत्यांना हे गाणं नक्की आवडेल याची खात्री आहे.” निर्माते संदेश गाडेकर म्हणाले, “साईरत्न एंटरटेनमेंट नेहमी नवनवीन गाणी आणतं. ‘सोनचाफा’मधील गौतमीचा परफॉर्मन्स अप्रतिम असून तिने पुन्हा एकदा रसिकांना वेडं केलं आहे.” पुन्हा चाहत्यांच्या मनावर राज्य गौतमी पाटीलच्या नृत्याचे लाखो चाहते आहेत. ‘सोनचाफा’मधील तिच्या दमदार अदांनी पुन्हा एकदा प्रेक्षकांना भुरळ घातली आहे.