Gautam Gambhir Reaction : टीम इंडिया ८९ धावांत गारद होताच कोच गंभीरचा चढला पारा! पत्रकार परिषदेत भरला सज्जड दम; रोहित-विराटसह फलंदाजांना सुनावले खडेबोल
Gautam Gambhir Reaction : चौथ्या एकदिवसीय सामन्यात ८९ धावांवर गारद झालेल्या भारतीय संघावर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने टीका केली आहे. गंभीर म्हणाला की, काळजी करण्याची गरज नाही कारण येथील परिस्थिती विश्वचषक सामन्यासारखी आहे.

Gautam Gambhir Angry Reaction India Batting Collapse 4th ODI World Cup Conditions : न्यूझीलंडविरुद्धच्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाला २४४ धावांच्या दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. एकदिवसीय इतिहासातील भारताच्या दुसऱ्या सर्वात मोठ्या पराभवानंतर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर भारतीय फलंदाजांच्या कामगिरीवर प्रचंड नाराज झाले आहेत. अवघ्या ८९ धावांत संपूर्ण संघ गारद झाल्याने गंभीरने पत्रकार परिषदेत संताप व्यक्त केला. मागील सामन्यातही भारताने १११ धावांत ७ विकेट्स गमावल्या होत्या. त्यामुळे आगामी विश्वचषकासारख्या आव्हानात्मक परिस्थितीत अशी फलंदाजी अत्यंत चिंताजनक असल्याचे गंभीर यांनी ठणकावून सांगितले.
२६ षटकांतच डाव आटोपला; गंभीरने व्यक्त केली तीव्र नाराजी –
सामन्यानंतर बोलताना गौतम गंभीर म्हणाला, “जेव्हा तुमचा संघ ९० धावांच्या आसपास सर्वबाद होतो, तेव्हा काळजी वाटणे स्वाभाविक आहे. मी नाराज का होऊ नये? ही परिस्थिती आगामी विश्वचषकात मिळणाऱ्या परिस्थितीशी सर्वाधिक मिळतीजुळती आहे. मला धावांपेक्षा या गोष्टीची जास्त चिंता आहे की, आम्ही अवघ्या २६ किंवा २७ षटकांतच सर्वबाद झालो. ही नक्कीच गंभीर बाब आहे.”
८ फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही; रोहित, विराट, श्रेयस शून्यावर बाद
🔴ROHIT & VIRAT NEED TO LEARN HOW TO HANDLE THESE KIND OF BOWLING? 🤯
Gautam Gambhir🎙️: Matt Henry kept attacking the stumps, got Rohit caught in the slips and beat Virat and Shreyas on the inside edge. He believes Indian batters need to learn how to handle this kind of bowling. https://t.co/AzLX43PyfX
— Sam (@cricsam02) November 13, 2026
न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना ३३३ धावांचा डोंगर उभारला होता. प्रत्युत्तरात भारतीय फलंदाजांनी मॅट हेन्री (६ विकेट्स) आणि मॅथ्यू फिशर (३ विकेट्स) यांच्यासमोर अक्षरशः शरणागती पत्करली. रोहित शर्मा, विराट कोहली आणि कर्णधार श्रेयस अय्यर खाते न उघडता बाद झाले, तर तब्बल ८ फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही.
‘आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोणताही चेंडू खेळण्यापलीकडचा नसतो’-
Gautam Gambhir minces no words following India’s loss to New Zealand in the 4th ODI
#NZvIND https://t.co/5NE4a0H156
— Cricbuzz (@cricbuzz) November 13, 2026
फलंदाजांना तंत्रात सुधारणा करण्याचा सल्ला देताना गंभीर म्हणाला, “आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असा कोणताही चेंडू नसतो, जो खेळता येऊ शकत नाही. मॅट हेन्रीने चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी केली, पण आम्हाला त्याचा प्रतिकार करता आला पाहिजे होता. चेंडू स्विंग होत असो वा नसो, फलंदाजांनी प्रत्येक परिस्थितीसाठी सज्ज असले पाहिजे.”
पहिल्या १० षटकांत संयम राखण्याचा आणि निर्णायक खेळण्याचा दिला सल्ला –
पुढे गंभीर यांनी स्पष्ट केले की, “अशा खेळपट्टीवर पहिल्या १० षटकांत एकही विकेट्स न गमावता ३५ ते ४० धावा करणेही पुरेसे असते. हेन्री आणि काईल जेमिसन ज्या लेंथवर गोलंदाजी करत आहेत, त्यावर पुढे येऊन खेळायचे की बॅकफूटवर जायचे, याबाबत फलंदाजांनी अधिक स्पष्ट आणि निर्णायक निर्णय घेण्याची गरज आहे.”





