फिल्टरपाड्याचा गुंड म्हणणाऱ्याला गौरव मोरेचं सडेतोड उत्तर; हिंदी रिऍलिटी शोमुळे केलं ट्रोल ! चॅटिंग झालं व्हायरल….

Gaurav More । Maharashtrachi Hasyajatra । ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामधून अभिनेता ‘गौरव मोरे’ला मोठी लोकप्रियता मिळाली. विनोदाच्या अचूक टाईमिंगमुळे तो खास करून ओळखला जातो. या कार्यक्रमामुळे त्याचा मोठा चाहता वर्ग निर्माण झाला आहे. मात्र मागील काही दिवसांपासून तो ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमात दिसत नाही.
त्यामुळे अनेक चर्चांना उधाण आले होते. मात्र, त्यानंतर स्वतः गौरवने हास्यजत्रेच्या सेटचा व्हिडीओ पोस्ट करत आपण ह्या कार्यक्रमातून एक्झिट घेत असल्याचं सांगितलं. गौरव मोरेने हा शो सोडल्याची माहिती दिल्याने चाहत्यांना धक्काच बसला.
गौरव सध्या ‘मॅडनेस मचाएंगे’ या कार्यक्रमात दिसत आहे. नुकतंच या हिंदी कार्यक्रमात त्याच्यासोबत अभिनेता कुशल बद्रिके व अभिनेत्री हेमांगी कवीन स्किट सादर केले आहे. या स्किटचा व्हिडीओ गौरवने सोशल मीडियावर शेअर केला होता. परंतु या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट करत गौरवला चांगलेच ट्रोल केले आहे.
गौरवनेही या नेटकऱ्यांना जशास तसं उत्तर दिल्याचं पाहायला मिळतंय. या दोघांच्या संभाषणाचे स्क्रिनशॉट देखील व्हायरल होताना दिसत आहे. गौरवच्या एका व्हिडिओवर कमेंट करत त्याला रानू मंडल म्हटलंय.
त्याचप्रमाणे त्याचा फिल्टरपाड्याचा गुंड असा देखील उल्लेख करण्यात आलाय. यावर गौरवनेही जशास तसं उत्तर दिल्याचं पाहायला मिळालं आहे. तसेच त्याच्या काही चाहत्यांनी त्याला अशा लोकांना उत्तर देण्याची गरज नसल्याचं म्हटलंय.
नेमकं काय घडलं पाहा….
नेटकरी : “रानू मंडल झालाय बिचारा गौरव, फेम मिळालं आणि स्वतःला महान समजायला लागला. त्याला वाटलं ऑनलाइन फॅन्स त्याचे चित्रपट बघतील, शोचा टीआरपी वाढवतील पण प्रत्यक्षात वेगळंच होताना दिसतंय आणि पुढे पण दिसत राहणार.
एका पॉइंटला सगळं हातातून जाणार… चांगला अभिनेता होता म्हणून काय ते वाईट वाटतं असे थुक्रट विनोद मारताना बघून, भोजनेचं पण तसंच झालं. नशिबात जे लिहिलंय ते होणारच.”
गौरव मोरे : “आधी स्वतःच्या अकाउंटवरून बोला, मग आमच्याबद्दल बोला, बाकी गरमी एन्जॉय करा.”
नेटकरी : “मग हे अकाउंट कोणाचं आहे ? स्वतःच्या अकाउंटने म्हणजे नक्की काय असतं ? स्वतःचं नाव मेशन असलेलं अकाउंट? म्हणजे नाव बघून रिप्लाय देणार की खरा फोटो बघून त्यावर कमेंट करणार?”
इतर नेटकऱ्यांनी दिल्या प्रतिक्रिया : अशा लोकांना गौरव उत्तर देऊ नकोस असं इतर नेटकरी म्हणाले. त्यावर तो नेटकरी म्हणाला, “अरे लेका कोणाच्या बाजूने बोलतोयस तू नक्की?
माझ्या की महाराज गौरवादित्य? मराठी चांगलं माझं आहे म्हणणं आणि तू स्वतःचं बोलतोयस हिंदीत. मग मी जज करणारच ना. जर हा मराठीपेक्षा हिंदीला महत्त्व देत असेल तर बच्ची बच्ची वाला फिल्टरपाड्याचा गुंड.”
गौरव मोरे : “अहो फुकट कमेंट आहे म्हणून काहीही बोलायचं नसतं. घरी पण स्वतःच्या कुटुंबाबरोबर असंच बोलता का? स्वतःचा फोटो ठेवायला हिंमत लागते जी आपल्यात नाहीये. राहिला प्रश्न गुंडाचा तर कधी वेळ मिळाला तर चकर मारा फिल्टरपाड्याला सगळे समज-गैरसमज दूर होतील आणि हो स्वतःचा फोटो लावून बड्या बड्या बाता मारा कळलं का?”
View this post on Instagram
नेटकरी : “मुळात तुमच्या सारखा दिसणारा व्यक्ती एवढा का मागे आहे कळतं नाही चेहरा बघण्याच्या? हिंमत का लागते स्वतःचा फोटो ठेवायला ? काही लोकांना नाही आवडत स्वतःचे फोटो लावायला, त्यात अगदी हिंमत नाही वगैरे असा बालिश विचार मी तरी नाही केला अजून आणि फिल्टरपाडा अस्वच्छ एरिया आहे. सॉरी मला अॅलर्जी होईल. पण मी मान्य करतो तू तिथला हिरो असशील नो डाउट.”
गौरव मोरे : “हिंमत पाहिजे नाहीतर अशाना समाजात काय बोलतात माहितीयेना. अहो, चेहरा बघितल्यानंतर कळतं ना हा हिंमत आहे म्हणून आणि कोण आहे हा जो एवढा बोलतो मला ज्याला मी इकडे आमंत्रण सुद्धा दिलं नाही.
चला पाटील कोण आहे हे कळू द्या लोकांना या समोर आणि एरिया कसा आहे, तो माझा आहे, माझी भूमी आहे. तुमच्यासारखा लपून नाही बोलतो जे आहे ते समोर आहे. डिपी ठेवा.” गौरवच्या या प्रत्युत्तरानंतरही तो नेटकरी अभिनेत्याला ट्रोल करतच राहिला.






