Gaurav Gogoi: आसाम विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे.आतापर्यंतच्या कलानुसार, हिमंता राज्यात पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे. दरम्यान , या सगळ्यात काँग्रेसचा आक्रमक आणि तडफदार आवाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गौरव गोगोई यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. आसाममध्ये पुन्हा हिमंता सरकार येण्याची आता फक्त ओपचारिकता बाकी राहिली आहे. तर काँग्रेसच्या बड्या नेत्यांचा पराभव झाल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये काँग्रेस नेते गौरव गोगोई आसाममधील जोरहाट मतदारसंघातून २३,१८२ मतांनी पराभूत झाले. भाजपचे हितेंद्र नाथ गोस्वामी या जागेवर विजयी झाले.गोगोई यांच्या पराभवाने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. (Gaurav Gogoi) Gaurav Gogoi: गौरव गोगोई यांचा तब्बल २३ हजार मतांनी पराभव ; काँग्रेसला मोठा धक्का दरम्यान, यावेळी आसाम विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतदान झाले असून, सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष दोघेही याचा फायदा घेत असल्याचा दावा करत आहेत. एक्झिट पोलनुसार एनडीएला मोठी आघाडी मिळाली आहे. (Gaurav Gogoi) मात्र, अनेक जागांवर लढत अत्यंत अटीतटीची असल्याचे म्हटले जात आहे. काँग्रेस आघाडीनेही दमदार कामगिरी केल्याचा दावा केला असून, निकाल जाहीर होण्यापूर्वी राजकीय हालचाली तीव्र झाल्या आहेत. Gaurav Gogoi