Gas cylinder – पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षाचे पडसाद भारतात उमटत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी व्यावसायिक वापराच्या एलपीजी सिलिंडरच्या दरात १९५.५० रुपयांची मोठी वाढ केली आहे. मात्र, घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरचे दर स्थिर ठेवल्याने सर्वसामान्यांना तूर्तास दिलासा मिळाला आहे. तेल कंपन्यांनी जाहीर केलेल्या नवीन दरवाढीनुसार, दिल्लीत १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरची किंमत आता २,०७८.५० रुपयांवर पोहोचली आहे. यापूर्वी १ मार्च रोजी या सिलिंडरच्या दरात ११४.५ रुपयांची वाढ करण्यात आली होती. एका महिन्यात दुस-यांदा झालेली ही मोठी दरवाढ हॉटेल, उपाहारगृहे आणि केटरिंग व्यावसायिकांचे बजेट कोलमडवणारी ठरणार आहे. Gas cylinder व्यावसायिक सिलिंडरचे दर कडाडले असले, तरी घरगुती वापराच्या (१४.२ किलो) सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. ७ मार्च रोजी घरगुती सिलिंडरच्या दरात ६० रुपयांची वाढ झाली होती, त्यानंतर दिल्लीत याची किंमत ९१३ रुपये इतकी कायम आहे. दुसरीकडे, पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीही स्थिर आहेत. दिल्लीत पेट्रोल ९४.७२ रुपये, तर डिझेल ८७.६२ रुपये प्रति लिटर दराने मिळत आहे. पश्चिम आशियातील युद्धामुळे जागतिक ऊर्जा पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. परिणामी, जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत सुमारे ५० टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम यांसारख्या सरकारी कंपन्या दर महिन्याच्या १ तारखेला जागतिक कल आणि चलन विनिमय दराचा आढावा घेऊन एलपीजीच्या किमती निश्चित करतात. हे देखील वाचा : War Updates: ट्रंप यांना मोठा धक्का ! युद्धाच्या पार्श्वभूमीवर ब्रिटनचा बदलता सूर, ‘नाटो’मधून बाहेर पडण्याचा अमेरिकेचा इशारा