Pune District : वडगांव रस्त्यावर कचर्याचे साम्राज्य

आळंदी : आळंदी ग्रामीण येथील चर्होली खुर्द ग्रामपंचायत हद्दीतील वडगांव रस्त्यावर मोठ्या प्रमाणार कचरा रस्त्यावर आल्याने तेथील रस्ता अरुंद झाला आहे. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे तसेच नागरिकांना ये जा करताना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे.
रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कचर्याचा ढीग आल्याने त्या भागातून नागरिकांना चालण्यासाठीही कसरत करावी लागत आहे. सातत्याने याभागात मोठ्या प्रमाणात कचरा असतो.
वेळोवेळी नागरिकांकडून या भागात कचरा होऊ नये यासाठी मागणी होत आहे. यावेळी ग्रामपंचायत सदस्य अनिकेत कुर्हाडे यांनी सांगितले की, येथील कचर्याकडे व कचर्यामुळे होणार्या समस्येकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष असून त्यांनी तेथील कचरा नियमित उचलुन न्यावा. येथील कचरा वारंवार पेटवून दिला जातो त्यामुळे धूर होऊन हवेचे प्रदूषण होते. या प्रदूषणामुळे येथील भागातील नागरिकांना नाक, घशाचे विकार होऊ शकतात.





